शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीतील अतिक्रमण हटावमुळे घेतला कोंडलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST

गेल्या अनेक वर्षांपासून काही भागात अतिक्रमण कायम होते. शहरातील अनेक रस्त्यावर दुकानदार आणि काहींनी फुटपाथवर शेड बांधून अतिक्रमण केले ...

गेल्या अनेक वर्षांपासून काही भागात अतिक्रमण कायम होते. शहरातील अनेक रस्त्यावर दुकानदार आणि काहींनी फुटपाथवर शेड बांधून अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नगर परिषदेने शहरात मुनादी देऊन सार्वजनिक रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांनी ते तत्काळ काढावे, अशी सूचना दिली होती. मात्र व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण काढले नव्हते.

ही मोहीम मुख्याधिकारी डॉ.माधुरी सलामे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता अविनाश बंडावार, पाणी व स्वच्छता अभियंता नितीन गौरखेडे, कार्यालय अधीक्षक ओसीन मडकाम, कर निरीक्षक बी.आर.पिंपळे, लेखापाल संजय शेळके, लिपीक योगेश दुमाने, गिरीश बांते, राजू कांबळे आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राबविली.

(बॉक्स)

हे मार्ग झाले मोकळे

- नगर परिषद प्रशासनाने साेमवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली व सार्वजनिक रस्त्यावर व नालीवर असलेले अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढून रस्ते मोकळे केले. पहिल्या दिवशी जुन्या बसस्थानकापासून तर नगर परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्यावसायिक व छोट्या दुकानदारांनी लावलेले टिनाचे शेड, झोपड्यांचे अतिक्रमण काढले.

- दुसऱ्या दिवशी मंगळवारला इंदिरा गांधी चौकापासून गुजरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या दुकानदारांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात सर्वाधिक वाहतुकीची कोंडी या रस्त्यावर होत होती. त्यामुळे दुकान लाइनमधीलही अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढतेवेळी अनेकांच्या घराच्या पायऱ्याही तोडण्यात आल्या. त्यानंतर काळागोटाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले.

060721\4457img_20210706_204113.jpg

अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत रस्त्यावर असलेले झाड हटविताना