शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विधानसभेला निवांत करा मतदान; जिल्ह्यात नवीन २२ केंद्रांची पडली भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 15:49 IST

तिन्ही विधानसभा क्षेत्रात ९७२ बुथ: ८ लाख १४ हजार ८५७ मतदार बजावणार हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत मतदार याद्या अपडेट नसणे, बुथ बदलणे, तसेच अनेकांचे नावच यादीतून गायब झालेले होते. या समस्यांचा सामना मतदारांना करावा लागला. ही स्थिती पुन्हा ओढावू नये यासाठी निवडणूक विभागाने सतर्कता बाळगत मतदार याद्या अपडेट केल्या. जिल्ह्यात यापूर्वी ९५० बुथ होते. त्यात २२ नवीन बुथची भर पडली आहे. आता ही संख्या ९७२ एवढी झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गोंधळ उडणार नसल्याची निवडणूक विभागाला खात्री आहे. 

भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला होता. यानुसार अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला संबंधित विधानसभा क्षेत्रातील सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली तसेच जिल्हा स्तरावरसुद्धा याद्या करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक स्तरावरील याद्या त्या-त्या बुथमध्ये आहेत. 

विशेष म्हणजे, बीएलओमार्फत स्थानिकस्तरावर पुनरीक्षण कार्यक्रम राबवून नावात बदल, फोटो बदल करणे, नवीन मतदार कार्ड उपलब्ध करून देणे, यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. 

८,१४,८५७ एकूण मतदार जिल्ह्यातअंतिम मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील एकूण ८ लाख १४ हजार ८५७ मतदारांचा समावेश झालेला आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ४ लाख ९ हजार ५४४ आहे, तर महिला मतदार ४ लाख ५ हजार ३०४ एवढे आहेत. ९ मतदार तृतीयपंथी आहेत.

गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्र वाढविलेलोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक मतदान बुथवर मतदानासाठी गर्दी उसळली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. बुथवरील गर्दी टाळण्यासाठी मतदान बुथ वाढविण्यात आलेले आहेत. 

अस्थायी केंद्र नाही जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीसाठी एकूण ९७२ मतदान केंद्र राहणार आहेत. हे सर्व मतदान बुथ स्थायी स्वरुपाचे असून जिल्ह्यात एकही अस्थायी बुथ नाही

१५,७१४ नवमतदार जिल्ह्यात तरुण मतदारांची संख्या १५ हजार ७७४ आहे. दिव्यांग मतदारांची संख्या ५ हजार ९६३ एवढी आहे. त्यापैकी पुरुष मतदार ३ हजार ६७५ व महिला मतदार २ हजार २८८ आहेत तसेच वयोवृद्ध मतदार ६ हजार ६८६ मतदार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यांनी दिली. 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभाGadchiroliगडचिरोली