शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
6
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
7
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
8
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
9
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
10
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
11
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
12
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
13
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
14
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
15
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
16
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
17
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
18
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
19
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
20
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तीन पिढ्यांची अट शिथील करा

By admin | Updated: September 15, 2016 02:04 IST

नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून ४० ते ५० वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी २००८ मध्ये वनहक्क मिळण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला.

अतिक्रमित वन जमिनीचे पट्टे द्या : एटापल्ली तालुक्यातील नागरिकांची पालकमंत्री व खासदारांकडे मागणी
एटापल्ली : नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून ४० ते ५० वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी २००८ मध्ये वनहक्क मिळण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला. परंतु तीन पिढ्यांच्या अटीचे कारण दाखवून शेतकऱ्यांचे वनहक्क दावे प्रलंबित ठेवण्यात आले. त्यामुळे तीन पिढ्यांची अट शिथिल करावी, अशी मागणी एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व खा. अशोक नेते यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली.
एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी, दोलंदा, दिंडवी, भापडा, सरखेडा, कसनसूर, कसुरवाही, वडसा (खुर्द), वडसा कला, कुरूमवाडा, वेडमागड, सोहगाव, हनपायली, ईरपनपायली, मोरावाही टेक्का, कोहका, पेंदूलवाही, जव्हेली, सिरपूर, कोकोबंडा, रोप्पी, कारका येथील शेतकरी मागील ४० ते ५० वर्षांपासून नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करीत आहेत. वास्तव्यापासूनच वन जमिनीवर अतिक्रमण करून उपजीविका करीत आहेत. याची नोंद महसूल विभागाकडे आहे. वनहक्क कायदा अधिनियम २००६ नुसार अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या वन जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी २००८ पासून वनहक्क दाव्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर केले. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे तीन पिढ्यांची अट शिथिल करून तत्काळ वनहक्क पट्टे वितरित करावे, अशी मागणी जि. प. सदस्य बाजीराव कुमरे, पं. स. सदस्य सपना कोडापे, हरिदास टेकाम, देवनाथ सोनुले, मल्लाजी येनगंटीवार, इब्राहिम पठाण, बुधाजी गुरनुले, केशव पेदापल्लीवार, संपत चौधरी, विश्वनाथ सोनुले, देवाजी गुरनुले, तुकाराम वाटगुरे, श्रीहरी गुरनुले, कवडू गुरनुले, सावंत गुरनुले, मनिराम भोयर, मारोती वाटबरे, किसन कांबळे, श्रावण कांबळे, सोनुले यांनी केली आहे.