बियाणे केंद्रांवर पोहोचली
By Admin | Updated: June 19, 2014 23:50 IST2014-06-19T23:50:47+5:302014-06-19T23:50:47+5:30
२०१४ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बियाणे कंपनीकडे बियाण्यांची मागणी करण्यात आली. शासनाच्यावतीने सर्व पिकांची मिळून २५,३३७.३३ बियाण्यांचा पुरवठा जिल्ह्याला झाला

बियाणे केंद्रांवर पोहोचली
शेतकऱ्यांची लगबग : २५ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा
गडचिरोली : २०१४ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बियाणे कंपनीकडे बियाण्यांची मागणी करण्यात आली. शासनाच्यावतीने सर्व पिकांची मिळून २५,३३७.३३ बियाण्यांचा पुरवठा जिल्ह्याला झाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.
जि.प. कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी भात, सोयाबीन, तूर, कापूस, मका, उडीद व तीळ या पिकाच्या बियाण्यांचे नियोजन केले. नियोजनासह कृषी आयुक्ताकडे मागणी केली. यावर कृषी आयुक्ताने भात पिकाचे ७ हजार ६२५ क्विंटल बियाण्यांचे आवंटन मंजूर केले. सोयाबीनचे १२२ क्विंटल, तूर ५४ क्विंटल बियाण्यांचे आवंटन मंजूर केले. जिल्ह्याला महाबिज या सरकारी तसेच खासगी उत्पादकाकडून बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.
२४ हजार ६०५.८७ क्विंटल भात पिकाच्या बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. सोयाबीन ६०६.३९, तूर ५४.३४, कापूस १५.७३ क्विंटल, मका ५५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे.
महाबिज कंपनीकडून भात पिकाचे ८ हजार २४१.८ क्विंटल तर खासगी उत्पादकांकडून १६ हजार ३६४.१० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. महाबिजकडून सोयाबीन पिकाचे ८२.८० क्विंटल तर खासगी उत्पादकांकडून ५२३.५९ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला. महाबिजकडून तूर पिकाचे १७.३४ क्विंटल बियाणे तर खासगी उत्पादकांकडून ३७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला. खासगी उत्पादकांकडून १५.७३ क्विंटल कापूस बियाण्यांचा पुरवठा तर ५५ क्विंटल मका पिकाच्या बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. पुरवठा करण्यात आलेली सर्व पिकांची बियाणे सहकारी संस्थांच्या तसेच खासगी कृषी केंद्रावर उपलब्ध असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)