शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्रबाबा आत्रामवर वन विभाग मेहरबान का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 01:03 IST

दोडेपल्ली गावच्या चितळ शिकार प्रकरणात सात आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणात सक्रीय सहभाग असलेले

आलापल्ली : दोडेपल्ली गावच्या चितळ शिकार प्रकरणात सात आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणात सक्रीय सहभाग असलेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सध्या भाजपमध्ये असलेले रवींद्रबाबा आत्राम यांना अटक करण्यात वन विभाग दिरंगाई करीत असल्याचे दिसून येत आहे. दीड महिना उलटूनही रवींद्रबाबा आत्राम वन विभागाच्या पथकाला हाती लागलेले नाही. अहेरी तालुक्याच्या दोडेपल्ली गावात ६ मार्च २०१६ ला कक्ष क्रमांक ३२ मध्ये चितळाची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या ठिकाणावरून वन विभागाने चार किलो मांस व एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासात आनंद लचमा तोरेम रा. दोडेपल्ली, दीपक सडमेक, दिवाकर सडमेक, नारायण मडावी, पिंटू पेंदाम, प्रकाश पेंदाम यांना अटक केली. ज्यांच्या बैलबंडीतून हे मांस आणण्यात आले. ते विठ्ठल तलांडे यांनाही पोलिसांनी अटक केली. परंतु या प्रकरणात मुख्य भूमिका असलेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांना मात्र अद्याप वन विभागाने अटक केलेली नाही. दीड महिना उलटूनही रवींद्र आत्राम यांच्यावर वन विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. सात आरोपींना अटक केल्यानंतर रवींद्र आत्रामांवर वन विभाग एवढा मेहरबान का, असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्यांना पडला आहे. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात रवींद्र आत्राम यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतरही आत्राम वन विभागाकडे सरेंडर झाले नाही व अजुनही ते फरारच आहे.या संदर्भात तपास अधिकारी तथा उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांनी सांगितले की, रवींद्र आत्राम यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमच्या चमू एकत्रीतपणे दिवसरात्र काम करीत आहे. आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी सध्या तपास सुरू आहे. आत्राम यांना पकडण्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाईल. लवकरच त्यांना जेरबंद करण्यात यश येईल, असे सांगितले. उल्लेखनिय बाब म्हणजे, रवींद्रबाबा आत्राम यांच्या बंगल्यावर धाड घातली त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व प्राण्यांचे अवयव तेथून वन विभागाने जप्त केले होते. त्यांना चौकशीसाठी ११ मार्च रोजी उपस्थित राहण्याबाबत नोटीसही बजाविण्यात आला होता. परंतु ते उपस्थित झाले नव्हते. तेव्हापासून ते फरारच आहेत. (प्रतिनिधी)