शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

कारविरहित दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली रॅली

By admin | Updated: September 22, 2014 23:19 IST

पेट्रोल व डिझेल वाचविण्याबरोबरच संतुलनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी २२ सप्टेंबर हा दिवस कारविरहित दिन म्हणून पाळल्या जाते. या दिनानिमित्त भगवंतराव हिंदी हायस्कूल

गडचिरोली : पेट्रोल व डिझेल वाचविण्याबरोबरच संतुलनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी २२ सप्टेंबर हा दिवस कारविरहित दिन म्हणून पाळल्या जाते. या दिनानिमित्त भगवंतराव हिंदी हायस्कूल व इतर शाळांनी शहरातून रॅली काढली. सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली तथा राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर रोजी शहराच्या मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवाजी हायस्कूल गडचिरोली, संत गाडगे महाराज, राणी दुर्गावती हायस्कूल, विद्याभारती कन्या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिक्षक एम. जे. पदा, एस. एम. खांडरे, एम. एम. खुणे, बी. वाय. जांभुळकर, एस. एम. डांगे, राजेश बिचुरे, के. व्ही. कारेकार यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.भगवंतराव हिंदी हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेना विभागाच्यावतीनेही शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्या लिना हकीम, वनीकरण विभागाचे सय्यद, हेमके, रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते. सदर रॅली तहसील कार्यालय, इंदिरा गांधी चौक, वंजारी मोहला व आरमोरी मार्गाने काढण्यात आली. त्यानंतर स्थानिक इंदिरा गांधी चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. दिवसेंदिवस वाहनांचा वापर वाढत चालला आहे. जमिनीतून खनीज तेलाचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात असल्याने दिवसेंदिवस पेट्रोलचे साठे कमी होत चालले आहेत. वाहनांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. यावर आळा घालण्यासाठी दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी कारविरहित दिनाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये किमान या दिवशी कार किंवा दुचाकीचा वापर न करता. सायकल, सार्वजनिक वाहन आदींचा वापर कार्यालयात जाण्यासाठी करावा, असा संदेश देण्यात येतो. गडचिरोली येथील सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घेत गडचिरोली शहरात कारविरहित दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण संतुलनाबाबत पोस्टर, नारे, घोषवाक्य, फलक आदींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली. विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)