पावसाचा मिरचीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:00 IST2018-04-11T01:00:17+5:302018-04-11T01:00:17+5:30
सिरोंचा तालुक्यात मागील चार दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. याचा सर्वाधिक फटका मिरची पिकाला बसत आहे. वाळू घातलेली मिरची ओली होत आहे.

पावसाचा मिरचीला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात मागील चार दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. याचा सर्वाधिक फटका मिरची पिकाला बसत आहे. वाळू घातलेली मिरची ओली होत आहे.
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा परिसरात गोदावरीच्या काठांवर मिरची व मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तेलंगणा राज्यात मिरची पिकाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे जेव्हापासून सिरोंचाजवळ गोदावरी नदीवर पूल झाला आहे. तेव्हापासून आसरअल्ली, सिरोंचा भागात मिरची पिकाची लागवड वाढली आहे. या भागात लाल मिरची विकली जाते. शेतातून काढल्यानंतर सदर मिरची पाच ते सहा दिवस पुन्हा उन्हात सुकवावी लागते. काही शेतकऱ्यांनी मिरची सुकविण्यासाठी टाकली आहे. मात्र याचदरम्यान पाऊस येत असल्याने मिरची ओली होत आहे. विशेष म्हणजे, मिरची जमिनीवर टाकली जाते. पावसाचे पाण्यामुळे मिरचीचा मातीसोबत संपर्क येतो. त्यामुळे मिरचीला माती लागून मिरची खराब होते. मागील आठवड्यातही सिरोंचा तालुक्यात पाऊस झाला. याचा मोठा फटका शेतकºयांना बसला आहे.