कांँग्रेसने रोखली वडसात रेल्वे

By Admin | Updated: June 25, 2014 23:44 IST2014-06-25T23:44:36+5:302014-06-25T23:44:36+5:30

केंद्र सरकारने नुकतीच रेल्वे दरवाढ केल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. या दरवाढीच्या विरोधात देसाईगंज येथील रेल्वेस्थानकावर बुधवारी काँग्रेसतर्फे ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले.

RAILWAY RAILWAY | कांँग्रेसने रोखली वडसात रेल्वे

कांँग्रेसने रोखली वडसात रेल्वे

देसाईगंज : केंद्र सरकारने नुकतीच रेल्वे दरवाढ केल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. या दरवाढीच्या विरोधात देसाईगंज येथील रेल्वेस्थानकावर बुधवारी काँग्रेसतर्फे ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले.
जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हसन गिलानी यांच्या नेतृत्वात देसाईगंज तालुका काँग्रसचे अध्यक्ष विलास ढोरे, पंचायत समिती सभापती परसराम टिकले, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव शहजाद शेख, जिल्हा संनियत्रण समितीचे उपाध्यक्ष राजू आकरे, तालुका उपाध्यक्ष राजू रासेकर, गडचिरोली तालुका अध्यक्ष शंकरराव सालोटकर, नरेश शामदासानी, संजय गणवीर, नगरसेवक शरद मुळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजू बुल्ले, पंचायत समिती सदस्य शिवाजी राऊत, नितीन राऊत, जितू परसवानी, उद्धव सरदारे, आरीफ खानानी, शंकरपूरचे सरपंच विनायक वाघाडे, रवी निमकर, खालीद कुरेशी, संदीप तुमाने, विक्की टुटेजा, अरूण कुंभलवार, भारत तलमले व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रवाशांनीसुद्धा भाडेवाढ मागे घेण्याच्या मागणीचे समर्थन केले. यावेळी देसाईगंज पोलीस तसेच रेल्वे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भाडेवाढ मागे घेण्याची मागणी काँग्र्रेस पक्षाच्यावतीने आंदोलनादरम्यान करण्यात आली.

Web Title: RAILWAY RAILWAY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.