शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

सोलर वॉटर हीटरचा प्रश्न विधिमंडळात उचलणार

By admin | Updated: June 20, 2015 02:19 IST

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी तालुक्यातील घाटी येथील शासकीय आमश्रशाळेला भेट दिली ....

कुरखेडा : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी तालुक्यातील घाटी येथील शासकीय आमश्रशाळेला भेट दिली असता, या आश्रमशाळेतील सोलर वॉटर हीटर धूळखात पडून असल्याचे दिसून आले. अशा प्रकारचे शेकडो सोलर वॉटर हीटर बंद स्थितीत आहेत. यामुळे कोट्यवधी रूपयांचे शासनाने नुकसान झाले असून हा मुद्दा विधीमंडळात उपस्थित केला जाईल, अशी माहिती आ. क्रिष्णा गजबे यांनी दिली आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाने प्रत्येक शासकीय आश्रमशाळेला सोलर वॉटर हीटर उपलब्ध करून दिले. मात्र बहुतांश शाळांमधील वॉटर हीटर सुरूच झाले नाही. या वॉटर हीटरवर शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत. वापराअभावी सदर वॉटर हीटर केवळ शोभेची वस्तू बनली आहे. हा गंभीर प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण विधीमंडळात करणार आहोत, अशी माहिती आ. क्रिष्णा गजबे यांनी दिली.
आश्रमशाळेला भेटीदरम्यान त्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व आहार देण्याचे निर्देश संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले. यावेळी शाळेच्या समस्यांबाबत गावातील नागरिकांशीही चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावंडे, जिल्हा सचिव तथा पं. स. सदस्य चांगदेव फाये, तालुका संघटक जलालभाई सय्यद, रामहरी उगले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अन्य कार्यकर्ते व घाटी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)