गुरवळा ग्रामपंचायतीवर शेकापचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:37 AM2021-01-23T04:37:06+5:302021-01-23T04:37:06+5:30

गडचिराेली : तालुक्यातील गुरवळा ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांपैकी सहा सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आले आहेत. पुलखल, बाेदली, आरमाेरी तालुक्यातील ...

PWD flag on Gurwala Gram Panchayat | गुरवळा ग्रामपंचायतीवर शेकापचा झेंडा

गुरवळा ग्रामपंचायतीवर शेकापचा झेंडा

Next

गडचिराेली : तालुक्यातील गुरवळा ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांपैकी सहा सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आले आहेत. पुलखल, बाेदली, आरमाेरी तालुक्यातील माेहझरी, देलनवाडी, धानाेरा तालुक्यांतील हेटी, चामाेर्शी तालुक्यातील माेहुर्ली, सगणापूर, फराडा, लखमापूर बाेरी, हळदी या ग्रामपंचायतींमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. गुरवळा ग्रामपंचायतीत शेकापचे चंद्रकांत भाेयर, दर्शना भाेपये, छायाताई बांबाेळे, विलास अंडेलवार, जया मंटकवार, प्रकाश बांबाेळे, पुलखलमध्ये तुकाराम गेडाम, सावित्रीबाई गेडाम, बाेदली येथे विठ्ठल पिपरे, सुनीता पिपरे, इंदिरा नैताम, सुनीता चिळंगे, माेहझरी येथे शैला लाेनबले, राजेंद्र टेंभुर्णे, श्रीरंग कुमरे, वच्छला मडावी, मनीषा कुमरे, देलनवाडीत प्रिया कुमरे, हेटीमध्ये पुराेगामी युवक संघटनेचे खजिनदार मुरलीधर तुलावी, फराडा येथे हर्षना मडावी, सगणापूर येथे धनराज सेलाेटे, उज्वला भाकरे हे उमेदवार निवडून आले आहेत, अशी माहिती शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी दिली आहे. शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा, खजिनदार श्यामसुंदर उराडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय काेसनकर, विजया मेश्राम, ॲड. कबिर कालिदास, याेगेश चापले यांनी विजयी उमेदवारांसाेबत जल्लाेष साजरा केला.

Web Title: PWD flag on Gurwala Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.