शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांपासून धान खरेदी बंद

By admin | Updated: January 5, 2015 23:04 IST

स्थानिक आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी मागील पाच दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाले

सिरोंचा : स्थानिक आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी मागील पाच दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाले असून धान खरेदी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सिरोंचा परिसरातील हे एकमेव धान खरेदी केंद्र असल्याने शेकडो शेतकरी हजारो क्विंटल धान विक्रीसाठी सिरोंचा येथील धान खरेदी केंद्रावर आणतात. मात्र आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे सचिव व अध्यक्ष यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणची धान खरेदी मागील पाच दिवसांपासून बंद पडली आहे. शेतकऱ्यांनी आणलेले धान केंद्राच्या परिसरात अस्ताव्यस्त पडून आहेत. या धानावर परिसरातील डुकर, गायी, बकऱ्या डल्ला मारत आहेत. यामुळे शेतकऱ्याचे प्रतिदिवस किमान २०० ते ३०० रूपयांचे नुकसान होत आहे. या ठिकाणी धान ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांनी धान उघड्यावरच ठेवले होते. तीन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सदर धान भिजले. भिजलेले धान आता संस्था घेण्यास तयार नाही. त्यामुळे भिजलेले धान न्यावे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. बहुतांश शेतकरी सावकार व बँकेकडून कर्ज काढून धानाची शेती केली. त्यांचे कर्ज देण्यासाठी फेडण्यासाठीच धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी आणले. मात्र येथील सचिव व अध्यक्षाच्या मनमानी कारभारामुळे बारदाना उपलब्ध असतानाही धान खरेदी बंद ठेवली जात आहे.
शेतकऱ्यांनी आणलेल्या दिवशीय धान खरेदी केली असती तर या नुकसानीपासून शेतकरी वाचू शकले असते. पुढील तोटा कमी करण्यासाठी संस्थेने धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी रायुकाँचे तालुकाध्यक्ष सतिश भोगे, गादे, मेहरा, दाया पोचम, वासकुरी सत्यम, नुसेद्दी शंकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)