शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्ली व अहेरीत पाळणार जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

२५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला जिल्ह्यात नवीन ८५ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले. गडचिरोली शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधित २ हजार ३७५ रूग्णांपैकी १ हजार ७३४ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देदिवसभरात ६२ जण कोरोनामुक्त : जिल्हाभरात नवीन ८५ कोरोनाबाधितांची भर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी उपविभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी एटापल्ली शहरात २६ सप्टेंबर शनिवारपासून तर अहेरी शहरात २८ सप्टेंबर सोमवारपासून जनता कफ्यू लागू करण्याचा निर्णय दोन्ही शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे.
अहेरी शहरात सात दिवस तर एटापल्ली शहरात पाच दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. एटापल्ली शहरातील जनता कर्फ्यूला नागरिकांनी सहकार्य करावे, असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुल्लुरवार व न.प.चे उपाध्यक्ष रमेश गंपावार यांनी केले आहे.
२५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला जिल्ह्यात नवीन ८५ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले. गडचिरोली शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधित २ हजार ३७५ रूग्णांपैकी १ हजार ७३४ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अहेरी येथे ५ जण बाधित आढळले. यात शहरात ४ व आलापल्लीला १ जण बाधित आढळला. देसाईगंज तालुक्यात १४ नवीन बाधित आढळले. यात विसोरा १, देसाईगंज शहर ११, कुरूड मधील दोघांचा समावेश आहे. धानोरा तालुक्याच्या येरकड येथील २, आरमोरी शहरातील २ जण बाधित आढळून आले. कोरचीमधील ५ जण यात बोटेकसा २ तर शहरातील ३ जण बाधित मिळाले. कुरखेडा तालुक्याच्या कढोली येथील ६ जण कोरोनाबाधित आढळले. चामोर्शी तालुक्यात ९ जण बाधित आढळले. यात येनापूर १, आष्टी ३, अनखोडा १, मारोडा १ चामोर्शी २ तर वाघदरा १ जण बाधित मिळाला. एटापल्ली शहरातील २ तर भामरागडमधील ५ जण बाधित मिळाले. तसेच मुलचेरा तालुक्याच्या गोविंदपूर येथील १ जण कोरोना बाधित आढळून आला आहे.
अ‍ॅक्टीव्ह कोरोनाबाधितांपैकी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यातील ६२ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली ३३, आरमोरी २, धानोरा १, वडसा १७, मुलचेरा १, एटापल्ली १ व चामोर्शी तालुक्यातील ७ जणांचा समावेश आहे.

गडचिरोली शहराचा आलेख वाढतीवर
नवीन ८५ बाधितांमध्ये गडचिरोली शहरातील ३४ रूग्णांचा समावेश आहे. यामध्ये आयटीआय चौकाजवळील २, नवेगाव कॉम्प्लेक्स मधील १, जिल्हा परिषद २, सोनापूर कॉम्प्लेक्स १, विवेकानंदनगर १, चामोर्शी रस्ता १, येवली १, सर्वोदय वार्ड २, पोलीस कॉम्प्लेक्स २, गणेश कॉलनी १, अयोध्यानगर १, आरमोरी रस्ता गडचिरोली १, कारगिल चौकाजवळ १, अलंकार टॉकीज मागे १, रेड्डी गोडाऊन १, रामनगर ३, शिवाजी वार्ड १, भगतसिंग वार्ड १, लांजेडा २, कॅम्प एरिया १, गोकुळनगर १, मुरखळा १, वसंत शाळेजवळील एका बाधिताचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या