सर्पमित्रांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:39 IST2021-08-22T04:39:52+5:302021-08-22T04:39:52+5:30

महाराष्ट्र राज्यात जवळपास ५ ते १० हजार सर्पमित्र वन्यजीवाच्या रक्षणासाठी काम करीत आहेत. मात्र, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार ...

Provide necessary facilities for snake friends | सर्पमित्रांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवा

सर्पमित्रांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवा

महाराष्ट्र राज्यात जवळपास ५ ते १० हजार सर्पमित्र वन्यजीवाच्या रक्षणासाठी काम करीत आहेत. मात्र, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कोणताही वन्यजीव पकडणे, बंदिस्त करणे हा गुन्हा आहे; परंतु मानवी वस्तीत येणाऱ्या सापाचे लोकांपासून संरक्षण व्हावे आणि लोकांचे सापापासून संरक्षण व्हावे यासाठी वन विभागाकडे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना नाहीत.

सापाच्या रक्षणासाठी सर्पमित्रांना कायद्याच्या बाहेर जाऊन काम करावे लागते. वन विभागाचे नियोजनबद्ध काम नसल्याने सापाची योग्य आकडेवारीची माहिती उपलब्ध नाही. साप बंदिस्त करून ठेवणे, दुर्मीळ सापांची देवाणघेवाण करणे, सापांचे खेळ करणे, तस्करी करणे यासारख्या घटना वाढत आहेत, तसेच अप्रशिक्षित सर्पमित्रांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे सर्पमित्रांची रीतसर वनविभागात नोंद असावी, सर्पमित्रांना ओळखपत्र देण्यात यावे, युनिफार्म, सेफ्टी किट देण्यात यावे, सर्पमित्रांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात यावे, सर्पमित्रांना मानधनाची तरतूद करण्यात यावी, सर्पमित्राचा अपघात विमा काढण्यात यावा, अशा प्रकारच्या उपाययोजना शासनस्तरावर करण्यात याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Provide necessary facilities for snake friends