शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहावर प्रकल्प अधिकाऱ्यांची धाड

By admin | Updated: January 6, 2015 23:00 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत आरमोरी येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह चालविल्या जात आहे. या वसतिगृहाला प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर व वित्त

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत आरमोरी येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह चालविल्या जात आहे. या वसतिगृहाला प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर व वित्त व नियोजन अधिकारी डी. बी. खडतकर यांनी ३ जानेवारी रोजी भेट दिली असता, यात वसतिगृहाचे अधीक्षक मैंद यांनी तब्बल ७९ विद्यार्थी गैरहजर असताना त्यांना पटावर उपस्थित दाखविले. याप्रकरणी प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी अधीक्षक व संबंधीत भोजन पुरवठा कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत २४ शासकीय आश्रमशाळा व १५ हून अधिक वसतिगृह चालविले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी वसतिगृह व आश्रमशाळेतील वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी आकस्मिक गूप्त भेटी देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. आरमोरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश क्षमता २३५ आहे.
३ जानेवारी रोजी प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी रात्री ८ वाजता भोजनाच्यावेळी भेट दिली असता, या वसतिगृहात तब्बल ७९ विद्यार्थी गैरहजर असल्याचे दिसून आले. मात्र या वसतिगृहाचे अधीक्षक मैंद यांनी पटावरील रजिस्टरवर सर्वच २३५ विद्यार्थी हजर दाखविले असल्याचे आढळून आले. सदर वसतिगृहातील विद्यार्थी बायोमेट्रिक मशीनवर हजेरी नोंदवित नसल्याचेही भेटीदरम्यान आढळून आले. या संदर्भात पी. शिवशंकर यांनी विद्यार्थ्यांना विचारणा केली असता, बायोमेट्रिक मशीनवर योग्यप्रकारे थम्ब येत नसल्याचे कारण विद्यार्थ्यांनी पुढे केले. (स्थानिक प्रतिनिधी)