प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा
By Admin | Updated: August 9, 2014 23:42 IST2014-08-09T23:42:28+5:302014-08-09T23:42:28+5:30
प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तथा शिक्षक संवर्गाच्या अनेक समस्या मागील सत्रापासून प्रलंबित आहेत. प्रलंबित समस्या सोडविण्यासंदर्भात समितीच्यावतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा
चामोर्शी : प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तथा शिक्षक संवर्गाच्या अनेक समस्या मागील सत्रापासून प्रलंबित आहेत. प्रलंबित समस्या सोडविण्यासंदर्भात समितीच्यावतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. तरीही समस्या सोडविण्यात आले नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या समस्या त्वरित सोडवाव्या, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने संवर्ग विकास अधिकारी चामोर्शी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पं. स. स्तरावरून आॅनलाईन भरण्यात यावी, शालेय पोषण आहार योजनेतील गोंधळ दूर करणे, रिक्त पदांवर शिक्षकांचे त्वरित समायोजन करणे, बांगला माध्यमाच्या माहितीत दुरूस्ती करणे, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचा निकाल शाळांपर्यंत पोहोचविणे, चटोपाध्याय वेतन श्रेणीचे प्रस्ताव मार्गी लावणे, दीर्घ रजेच्या देयकाची कपात रक्कम संबंधीत शिक्षकाला देणे, आमगाव व चामोर्शी येथील शिक्षकांचे माहे जूनचे वेतन न अदा करणाऱ्यांवर कारवाई करणे, पं. स. स्तरावरील शालार्थ प्रणालीने वेतन शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे, मासिक वेतन महिन्याच्या १ तारखेला अदा करणे, सेवापुस्तक अध्यावत करणे, उन्हाळी सुट्यातील माहे मे व जूनचे कपात केलेले भत्ते त्वरित अदा करणे, अंशदायी पेंशन योजनेची रक्कम शिक्षकांना देणे, शिक्षण विभागात वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक भरती करणे, २०१४-१५ मधील प्रशिक्षणाचे टीए, डीए त्वरित जमा करणे, अपंग कर्मचारी, मतीमंद मुलांचे पालक यांचा कपात होणारा व्यवसाय कर कपात न करणे, ड्रेसकोडबाबत स्थिती स्पष्ट करणे, अंशदायी पेंशन योजनेची माहिती शिक्षकांना देणे, शिक्षकांकडील अतिरिक्त काम काढून घेणे व पूर्ण अध्यापन कार्य करण्यास मोकळे करणे, संघटनेची द्विमासिक सभा घेऊन कार्यपूर्ती अहवाल देणे, आयकटर टीडीएस प्रक्रिया पूर्ण न करणे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना नरेंद्र कोत्तावार, संजय लोणारे, अनिल बारई, राजेंद्र बाळराजे उपस्थित होते.