जंगल संवर्धनाला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:42+5:30
वैरागड येथे शनिवारी कक्ष क्र.१७४ मधील अतिक्रमण काढलेल्या वनक्षेत्रात शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सन २०१९-२० यावर्षात वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य कारणाºया वनमजूर व वनरक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. केवळ मानवीकृत रोपवन संवर्धनासाठी वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपली शक्ती खर्ची न घालता जे नैसर्गिकरित्या उभे जंगल आहे, त्याचे रक्षण करणे आपल्या कर्तव्याचा महत्त्वाचा भाग आहे.

जंगल संवर्धनाला प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : जंगलाचा ºहास ही चिंताजणक बाब असून अनियमित पाऊस, वाढते तापमान हे संकट रोखण्यासाठी अवैधरित्या होणारी वृक्षतोड थांबविणे गरजेचे आहे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीकडे दुर्लक्ष झाले तर भविष्यात मानवाला गंभीर संकटांना सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय वनसेवेतील अधिकारी मिलींश दत्ता शर्मा यांनी केले.
वैरागड येथे शनिवारी कक्ष क्र.१७४ मधील अतिक्रमण काढलेल्या वनक्षेत्रात शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सन २०१९-२० यावर्षात वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य कारणाºया वनमजूर व वनरक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. केवळ मानवीकृत रोपवन संवर्धनासाठी वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपली शक्ती खर्ची न घालता जे नैसर्गिकरित्या उभे जंगल आहे, त्याचे रक्षण करणे आपल्या कर्तव्याचा महत्त्वाचा भाग आहे.
जल, जमीन, जंगल यांचे महत्त्व सामान्य लोकांमध्ये रूजविण्याचे काम वनविभागातर्फे झाले पाहिजे, असे भारतीय वनसेवेतील अधिकारी शर्मा यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन क्षेत्रसहायक गाजी शेख यांनी केले तर आभार विकास शिवणकर यांनी मानले.