शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरची किमत एक हजारच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:38 IST

दाेन वर्षांपूर्वी गॅसचा वापर केवळ शहरातीलच नागरिक करत हाेते. ग्रामीण भागातील एखादाच कुटुंब गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत हाेता. मात्र, ...

दाेन वर्षांपूर्वी गॅसचा वापर केवळ शहरातीलच नागरिक करत हाेते. ग्रामीण भागातील एखादाच कुटुंब गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत हाेता. मात्र, उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यामुळे ९० टक्के घरांमध्ये आता गॅस पाेहाेचला आहे. सिलिंडरसाठी काेणतेही अनामत रक्कम न ठेवता गॅस कनेक्शन उपलब्ध हाेत हाेते. त्यामुळे अनेकांनी गॅस घेतला. आता मात्र सातत्याने किमती वाढत असल्याने गॅस भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील दाेन व्यक्तीच्या कुटुंबाला एक हजार रुपयांचा किराणा लागत नाही. अशा स्थितीत गॅससाठी हजार रुपये कसे काय भरायचे, असा प्रश्न नागरिकांसमाेर निर्माण झाला आहे.

बाॅक्स

सबसिडी तेवढीच, किमतीत वाढ

- दाेन वर्षांपूर्वी शासनाकडून २०० रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात हाेती. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने ५०० रुपयांचा सिलिंडर खरेदी केला तरी प्रत्यक्षात त्याला ताे सिलिंडर केवळ ३०० रुपयांना पडत हाेता. आता मात्र, सिलिंडरची किंमत एक हजार रुपयांच्या जवळपास पाेहाेचली आहे तरीही सबसिडी केवळ ४०.६० रुपये एवढीच ठेवली आहे. अनेकांना ही सबसिडीसुद्धा जमा हाेत नाही.

व्यावसायिक सिलिंडर ७५ रुपयांनी वाढले

घरगुती सिलिंडरची किंमत वाढवत असतानाच १९ किलाे वजनाचे व्यावसायिक कारणासाठी वापरले जाणारे सिलिंडर सुमारे ७५ रुपयांनी महाग झाले आहे. पूर्वी या सिलिंडरची किंमत १७५८ रुपये हाेती. आता ही किमत १८३३ रुपये झाली आहे.

- अनेक दुकानदार व्यावसायिक सिलिंडरचा वापर करतात. एकाचवेळी ७५ रुपयांनी सिलिंडर महागले आहे. त्यामुळे खर्च वाढून भाववाढ हाेण्याचा धाेका निर्माण झाला आहे.

काेट

शहरात चुली कशा पेटवायच्या

गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील कुटुंब पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करत आहेत. ग्रामीण भागात सरपण उपलब्ध हाेऊ शकते. मात्र, शहरात कुठून सरपण आणणार. त्यामुळे गॅसची किंमत कितीही वाढली तरी गॅसवरच स्वयंपाक करावा लागणार आहे.

- दामिनी जरूरकर, गृहिणी

गॅस सिलिंडर हे अत्यावश्यक गरजेमध्ये माेडणारी वस्तू झाली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवर जास्त प्रमाणात सबसिडी देण्याची गरज आहे. एक हजार रुपयांचा सिलिंडर खरेदी केल्यानंतर महिन्याचा बजेट बिघडत चालला आहे. शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- मनिषा भांडेकर, गृहिणी

आठ महिन्यांत १६६ रुपयांची वाढ

महिना

जानेवारी ७५०

फेब्रुवारी ८५३

मार्च ८४६

एप्रिल ८४६

मे ८६५

जून ८६५

जुलै ८९१

ऑगस्ट ९१६

सप्टेंबर ९४१