शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गुणवर्धित तांदूळ प्रकल्पाचे केंद्रीय चमुसमोर सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

राज्यात हंगाम २०१८-१९ मध्ये टाटा ट्रस्टमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड या तालुक्यांमध्ये पोषणयुक्त तांदुळाचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. आता केंद्र शासनाने हंगाम २०१९-२० साठी दिनांक १४ ऑगस्टच्या पत्रान्वये देशातील एकूण १५ जिल्ह्यांत पोषणतत्त्व गुणसंवर्धित तांदूळ हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता दिलेली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती; १० राज्यांच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांची आरमोरीत भेट

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत १० राज्यांच्या सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांची केंद्रीयस्तरावरील कार्यशाळा नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून त्या विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी आरमोरी येथील जेना मिलला भेट दिली. त्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील पोषणतत्व गुणसंवर्धित तांदळाच्या कामाचे सादरीकरण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्या अधिकाऱ्यांसमोर केले.राज्यात हंगाम २०१८-१९ मध्ये टाटा ट्रस्टमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड या तालुक्यांमध्ये पोषणयुक्त तांदुळाचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. आता केंद्र शासनाने हंगाम २०१९-२० साठी दिनांक १४ ऑगस्टच्या पत्रान्वये देशातील एकूण १५ जिल्ह्यांत पोषणतत्त्व गुणसंवर्धित तांदूळ हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्यात पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सदर प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे.या प्रकल्पाचे सादरीकरण करण्याकरिता केंद्र शासनाच्या तसेच या प्रकल्पासाठी तयारी दर्शविलेल्या अन्य राज्यातील अधिकाºयांसाठी, राज्य शासनाच्या वतीने दि.१३ व १४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण मंत्रालय तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव एस.जगन्नाथन उपस्थित होते. राज्य शासनाकडून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक उपस्थित होते. तसेच नागपूर विभागाच्या पुरवठा शाखेचे उपायुक्त रमेश आढे, सहसचिव सतीश सुपे, अवर सचिव नेत्रा मानकामे, कक्ष अधिकारी निशा गारोळे उपस्थित होते. या अधिकाऱ्यांसोबत अन्य १० राज्यांचे सचिव दर्जाचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी सदर कार्यशाळेस उपस्थित होते.गडचिरोली जिल्हातील भेटीचे नियोजन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी सहकार्य केले. जेना राईस मिलचे मालक हैदरभाई पंजवानी यांनी यावेळी धानाची राईस मिलमध्ये होणारी प्रक्रिया याबद्दलची माहिती दिली. यावेळी टाटा ट्रस्टच्या गडचिरोली प्रतिनिधी सोनल फर्नांडीस डिसुझा सुद्धा उपस्थित होत्या.असा असतो पोषणयुक्त तांदूळपोषणयुक्त तांदूळ म्हणजे १०० किलो तांदळामध्ये ९९ किलो आपला नेहमीचा तांदूळ असतो व पोषणयुक्त तांदूळ १ किलो मिसळून तो तयार केला जातो. यामध्ये लोह, विटामिन ए, बी ९ व बी १२ या पोषक तत्त्वांचा समावेश असतो. यामुळे अ‍ॅनिमिया या आजारावर मात केली जाते. गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्यामध्ये अ‍ॅनिमियाग्रस्तांची संख्या जास्त असल्याने या जिल्ह्याची निवड या प्रकल्पासाठी केली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी