शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय साॅ मिल हस्तांतरणाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

प्रशांत ठेपाले आलापल्ली : वन विभागाची शान म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील साॅ मिल वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित ...

प्रशांत ठेपाले

आलापल्ली : वन विभागाची शान म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील साॅ मिल वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील अनेक दिवसापासून ही साॅ मिल ताेट्याचा सामना करीत आहे. त्यामुळे वन विकास महामंडळाने खरेदी केल्यानंतर या मिलचे काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आलापल्ली भागातील सागवानाचा उच्च दर्जा लक्षात घेऊन सागाची कटाई करण्यासाठी जवळपास १२० वर्षांपूर्वी इंग्रजांनी आलापल्ली येथे साॅ मिल सुरू केली. राज्यात शासनाच्या मालकीच्या केवळ तीन साॅ मिल आहेत. त्यामध्ये डहाणू, पांढरकवडा व आलापल्ली येथील साॅ मिलचा समावेश आहे.

साॅ मिलमधील कर्मचारी वेळेवर हजर न राहणे, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार न पाडणे, लाकूड कापण्यासाठी आलेल्या ग्राहकाला उद्धट वागणूक देणे, तसेच हवी तशी सफाईदार लाकूड कटिंग करून न देणे, यामुळे बहुतांश नागरिक व ठेकेदारांनी आलापल्ली येथील साॅ मिलमधून लाकूड कटाई बंद केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथून लाकूड कटाई करून आणतात.

सागवान लाकडाच्या खांबांवर टिनाचे पत्रे टाकून साॅ मिल तयार करण्यात आली आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून ही मिल ताेट्यात आहे. आणखी ताेटा सहन करणे वन विभागाला व शासनालाही परवडणारे नाही. त्यामुळे ही मिल वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एन. वासुदेवन यांनी काही दिवसापूर्वी साॅ मिलला भेट देऊन पाहणी केली. हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याने मागील आठ दिवसापासून येथील कामकाज पूर्ण ठप्प पडले आहे. विशेष म्हणजे, वनविकास महामंडळ हा सुद्धा शासनाच्या विभागापैकी एक विभाग आहे. जे काम वनविभागाला जमले नाही, ते काम वनविकास महामंडळ करून साॅ मिलला नफ्यात आणणार काय, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. या साॅ मिलमध्ये चाैकीदार, कटर, सायर असे जवळपास १५ कर्मचारी आहेत. त्यांना इतर ठिकाणी सामावून घेतले जाणार आहे.