पं.स. पोटनिवडणुकीत भाजप विजयी
By Admin | Updated: July 1, 2014 23:29 IST2014-07-01T23:29:36+5:302014-07-01T23:29:36+5:30
चामोर्शी तालुक्यातील घोट पंचायत समिती गणाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मंदा परशुराम दुधबावरे या ६६० मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपचा गड कायम राखण्यात

पं.स. पोटनिवडणुकीत भाजप विजयी
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील घोट पंचायत समिती गणाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मंदा परशुराम दुधबावरे या ६६० मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपचा गड कायम राखण्यात दुधबावरे यांनी यश मिळविले आहे.
पं.स. सदस्य छायाताई वासेकर यांच्या निधनामुळे घोट पंचायत समिती गणाची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्यावतीने मंदा परशुराम दुधबावरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून अश्वीनी मधुकर वडेट्टीवार तर युवाशक्ती आघाडीकडून सुरेखा किशोर वैरागडे या रिंगणात होत्या. भाजपच्या मंदा दुधबावरे यांना १ हजार ८७४, काँग्रेसच्या अश्वीनी वडेट्टीवार यांना १ हजार १६९ तर युवाशक्ती आघाडीच्या सुरेखा वैरागडे यांना १ हजार २१४ मते मिळाली. या निवडणुकीत भाजपच्या दुधबावरे यांनी युवाशक्तीच्या वैरागडे यांचा ६६० मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिल्या.
काँग्रेसच्या उमेदवारासाठी आमदार डॉ. उसेंडी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपतर्फे प्रचाराची धूरा रामेश्वर सेलुकर, प्रकाश गेडाम, हेमंत दुधबावरे, विलास गण्यारपवार, अनुप अंध्येयंकीवार, केतन गण्यारपवार, रमेश कन्नाके, अशोक पोरेड्डीवार, स्वप्नील वरघंटे, जयराम चलाख, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, डॉ. देवराव होळी, भारती उपाध्ये, ढिवरू बारसागडे यांनी प्रचाराची धूरा सांभाळून पक्षाला यश मिळवून दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्रसिंह, सहाय्यक निवडणूक अधिकारी एस. टी. खंडारे, नायब तहसीलदार (निवडणूक) चडगुलवार यांनी काम पाहिले. आज चामोर्शी तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. विजयी उमेदवाराला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)