शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेटरअभावी वीज उपकेंद्र बंद

By admin | Updated: May 29, 2016 01:37 IST

शंकरपूर येथे सहा महिन्यांपूर्वीच ३३ केव्ही क्षमतेचे विद्युत उपकेंद्र बांधण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी आॅपरेटरची नियुक्ती ....

सहा महिन्यांपूर्वी काम पूर्ण : शंकरपुरातील ३३ केव्ही उपकेंद्र; नागरिक त्रस्तकोरेगाव/चोप : शंकरपूर येथे सहा महिन्यांपूर्वीच ३३ केव्ही क्षमतेचे विद्युत उपकेंद्र बांधण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी आॅपरेटरची नियुक्ती करण्यात न आल्याने सदर विद्युत उपकेंद्र बंद स्थितीत आहे. ग्रामीण भागातील जनतेला याचा फटका बसत आहे.शंकरपूर, चोप, कोरेगाव, बोडधा, रावणवडी, डोंगरमेंढा, कसारी, विठ्ठलगाव, पोटगाव, मोहटोला, किन्हाळा, पिंपळगाव या गावांसाठी विद्युत पुरवठा करण्याच्या उद्देशाने शंकरपूर येथे ३३ केव्हीचे उपकेंद्र बांधण्यात आले. यासाठी लाखो रूपये खर्च झाले. मात्र या उपकेंद्रात वीज वितरण कंपनीने तज्ज्ञ आॅपरेटरची नेमणूक केली नाही. त्यामुळे सदर उपकेंद्र सुरू झाले नाही. सध्या कार्यरत असलेल्या वीज केंद्रावर अनेक गावांचा भार आहे. त्यामुळे आवश्यक त्या दाबाचा वीज पुरवठा होत नाही. परिणामी अनेक विद्युत उपकरणे सुरू होत नाही. परिणामी गावकरी त्रस्त आहेत.सध्या उन्हाळा असल्याने कृषिपंप चालू नाहीत. तरीही कमी विद्युत दाबाचा पुरवठा सुरू आहे. विजेचा दाब कमी झाल्यानंतर वीज पुरवठा खंडित होतो. याबाबत नागरिकांनी विचारणा केल्यास तार तुटली असल्याचे कारण वीज कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र दररोज तारा तुटतात काय, असाही प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना वीज कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ शंकरपुरातील ३३ के व्ही उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)