शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

१० तासानंतर वीज सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

कोटगल येथे असलेल्या २२० केव्ही सब स्टेशनवरून गडचिरोली व धानोरा तालुक्यातील गावांना वीज पुरवठा केला जाते. यासाठी सेमाना, गडचिरोली, कोटगल, अमिर्झा, सावेला येथे ३३ केव्ही सबटेशन आहेत. गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गडचिरोली व धानोरा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणचे इन्सुलेटर तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.

ठळक मुद्देगडचिरोली शहर रात्रभर अंधारात : वीज कर्मचाऱ्यांनी घेतले परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गुरूवारी रात्री वादळ, पाऊस व मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट यामुळे गडचिरोली व धानोरा तालुक्यातील वीज यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. वीज कर्मचाऱ्यांनी रात्रभर केलेल्या परिश्रमानंतर १० तासांच्या कालावधीनंतर गडचिरोली व धानोरा तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत झाला.कोटगल येथे असलेल्या २२० केव्ही सब स्टेशनवरून गडचिरोली व धानोरा तालुक्यातील गावांना वीज पुरवठा केला जाते. यासाठी सेमाना, गडचिरोली, कोटगल, अमिर्झा, सावेला येथे ३३ केव्ही सबटेशन आहेत. गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गडचिरोली व धानोरा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणचे इन्सुलेटर तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.गडचिरोली शहराचा वीज पुवठा रात्री ८.२३ वाजता खंडीत झाला. संपूर्ण शहर अंधाराच्या सावटात सापडले होते. वीज कर्मचाºयांनी कोटगल लाईनवरील बिघाड दुरूस्त केल्याने कोटगल व कॉम्प्लेक्स परिसरातील वीज पुरवठा रात्री ११ वाजता सुरू झाला. त्यानंतर सेमाना परिसरातील विद्युत लाईनवरील बिघाड दुरूस्त केल्यानंतर शहरातील काही भागाचा वीज पुरवठा रात्री १ वाजता सुरू झाला. काही वार्डांमध्ये मात्र वीज पुरवठा सुरू होण्यास शुक्रवारी सकाळचे ६ वाजले. इंदिरानगर व लांझेडा येथील वीज पुरवठा शुक्रवारी दुपारी १ वाजता सुरू झाला. रात्रभर वीज नसल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली. अमिर्झा, सावेला, धानोरा तालुक्यातील गट्टा, पेंढरी, मुरूमगाव, धानोरा येथे गडचिरोली येथूनच वीज पुरवठा केला जाते. वादळामुळे झाडे कोसळल्याने या भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला. याही भागाचा वीज पुरवठा शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सुरू झाला.गुरूवारी रात्रभर सुरू होती शोधमोहीममोठ्या प्रमाणात विजा कोसळल्याने अनेक खांबावरील इन्सुलेटर फुटले. त्यामुळे रात्री ८.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली व धानोरा तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर वीज कर्मचाºयांनी रात्रभर शोधमोहीम राबवून बिघाड दुरूस्त केला.

टॅग्स :electricityवीज