शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

Coronavirus; गडचिरोलीच्या आदिवासींनी कोरोनाला रोखण्यासाठी तयार केली झाडाच्या सालीपासून पावडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 7:30 AM

Gadchiroli news कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने या आजाराला रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्यात गडचिरोलीच्या आदिवासींनीही स्वत:साठी तयार केलेल्या आयुर्वेदिक पावडरची भर पडली आहे. या पावडरला (औषधाला) कोणीतीही शासकीय मान्यता नसल्याने त्यावर कोणी विश्वास ठेवो अथवा न ठेवो, मात्र या भागातील माडिया जमातीच्या लोकांचा पूर्ण विश्वास आहे.

ठळक मुद्देआदिवासी गावांचा प्रयोगआजारापासून बचाव होण्याचा गावकऱ्यांना विश्वास

 

रामचंद्र कुमरी

 लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने या आजाराला रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्यात गडचिरोलीच्या आदिवासींनीही स्वत:साठी तयार केलेल्या आयुर्वेदिक पावडरची भर पडली आहे. या पावडरला (औषधाला) कोणीतीही शासकीय मान्यता नसल्याने त्यावर कोणी विश्वास ठेवो अथवा न ठेवो, मात्र या भागातील माडिया जमातीच्या लोकांचा पूर्ण विश्वास आहे. या औषधामुळे कोणतेही आजार होणार नाहीत, या भावनेतून गावकरी या औषधाचे सेवन करत आहेत.

अहेरी - सिरोंचा या मुख्य मार्गापासून आतमध्ये ३० किलोमीटरवर झिंगानूर हे गाव आहे. झिंगानूरसह परिसरातील छोट्या गावांमध्ये आदिवासी माडिया जमातीमधील लोक राहतात. कोरोना नावाच्या आजाराची माहिती या गावापर्यंत पोहोचल्यानंतर गावातील पुजारी आणि पेरमा यांच्या मार्गदर्शनात गावकऱ्यांसाठी औषध तयार करण्यात आले. जंगलातून विशिष्ट झाडांची साल काढून ती गावातील गोटुलमध्ये (समाज भवन) कांडून बारीक करण्यात आली. त्यात इतर आणखी काही आयुर्वेदिक वनस्पती टाकून तयार झालेले पावडर प्रत्येक कुटुंबाला ८० ग्रॅम याप्रमाणे वाटप करण्यात आले. या औषधाला शास्त्रीय आधार नसल्याने सरकारी डॉक्टर त्या पावडरला औषध म्हणून मानायला तयार नाही.

कोणत्या झाडाची साल, गुपित कायम

- गावातील पुजारी किंवा पेरमा नेमके कोणत्या झाडाची साल काढून आणतात. हे मात्र गुपित ठेवतात. गावावर कोणत्याही सामूहिक आजाराचे संकट आले की, या पद्धतीने ते स्वत: जंगलात जाऊन झाडाची साल आणतात आणि गावातील युवा वर्गाच्या हाताने सामूहिकपणे ती कांडून  हे पावडर तयार केले जाते.- हे पावडर तयार केल्यानंतर ग्रामदेवतेची पूजा करून सर्व गावकऱ्यांना तिथेच मोहाच्या पानावर ते पावडर वाटप केले जाते. नंतर ते औषध म्हणून (पावडर) मोहाच्या दारूत टाकून घरातील सदस्यांना दिले जाते. मोहफुलांची दारू हे दुर्गम भागातील आदिवासी समाजाचे नियमित पेय असल्याने सर्वजण ते औषध घेतात.

अशा प्रकारचे जडीबुटीचे पावडर दुर्गम भागातील लोक घेत असतील, पण ते कोरानावरील औषध होऊ शकत नाही. त्याला कोणताही शास्रीय आधार नाही. असे असले तरी औषध घेतल्याने आता आजार होणार नाही, असा गावकऱ्यांच्या मानसिकतेता बदल होऊ शकतो.

- डॉ.एम.पी.कन्नाकेतालुका आरोग्य अधिकारी, सिरोंचा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस