रस्त्यांवरील खड्डे व शौचालय भ्रष्टाचारावरून सभेत घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:00 IST2018-04-09T23:00:09+5:302018-04-09T23:00:09+5:30
चामोर्शी पंचायत समितीची वार्षिक आमसभा पंचायत समितीच्या पटांगणात सोमवारी पार पडली. या सभेत चामोर्शी तालुक्यात सुरू असलेला अवैध रेती उपसा व शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असतानाही केली जाणारी निधीची उचल यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामध्ये घमासान चर्चा झाली.

रस्त्यांवरील खड्डे व शौचालय भ्रष्टाचारावरून सभेत घमासान
ओढले ताशेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी पंचायत समितीची वार्षिक आमसभा पंचायत समितीच्या पटांगणात सोमवारी पार पडली. या सभेत चामोर्शी तालुक्यात सुरू असलेला अवैध रेती उपसा व शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असतानाही केली जाणारी निधीची उचल यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामध्ये घमासान चर्चा झाली.
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, सभापती आनंद भांडेकर, उपसभापती आकुली बिश्वास, जि.प. सदस्य प्रा. रमेश बारसागडे, नामदेव सोनटक्के, विद्या आभारे, रंजिता कोडापे, शिल्पा रॉय, पं.स. सदस्य रेखा नरोटे, उषा सातपुते, विष्णू ढाली, संगीता भोयर, धर्मशीला सहारे, भाग्यश्री चिंतलवार, भाऊराव डोर्लीकर, माधव परसोडे, चंद्रकला आत्राम, प्रिती बिश्वास, विनोद मडावी, सुरेश कामेलवार, वंदना गौरकर, शिवराम कोसरे, शंकर आकरेड्डीवार, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख उपस्थित होते. वार्षिक आमसभेच्या सुरूवातीला जिल्हा परिषद कुरूड शाळेच्या मुलांनी स्वागतगीत सादर केले. राष्टÑगीत व संविधानाची शपथ घेऊन सभेला सुरूवात झाली. तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या आमचा गाव, आमचा विकास हा उपक्रम सुरू केला आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जनतेच्या तक्रारी व समस्या अधिकाऱ्यांनी सोडविण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
मुरखळा ग्रा.पं. सदस्य यशवंत लाड यांनी गावात असलेल्या शासकीय इमारती ग्रामपंचायत प्रशासनाकडे हस्तांतरीत केल्यास दुरूस्ती होऊ शकते, असा मुद्दा उपस्थित केला. विनोद गौरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यावर लाखो रूपये खर्च केले. गणूपर-जैरामपूर मार्गावरील खड्ड्यांचे मोजमाप केले. मात्र खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, असा मुद्दा उपस्थित केला. माणिकचंद कोहळे यांनी चामोर्शी तालुक्यात अवैध रेती, मुरूम, गौण खनिज व उपसा वाढला आहे. मार्र्कंडा मार्गावरील आयटीआय जवळ असलेल्या डोंगरीवर अवैध उत्खनन झाले आहे. याची चौकशी करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, असा मुद्दा उपस्थित केला. मंगेश पोरटे यांनी अपंगांसाठी असलेल्या राखीव निधीचे अनेक ग्रामपंचायतींनी वाटप केले नाही. ज्या ग्रामपंचायतींनी निधीचे वाटप केले नाही, संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करावी, असे निर्देश सभा अध्यक्षांनी दिले.
चामोर्शी तालुक्यातील घरकूल व शौचालय बांधकामाची चौकशी करून बांधकाम न करताच पैशाची उचल करणाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी दिले.
शासनाच्या योजना राबविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांच्यामध्ये समन्वय साधून विकास करता येते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमसभेकडे पाठ फिरविली. अशा अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाई व वेतनवाढीची कारवाई करण्याबाबतचा ठराव आमसभेत घेण्यात आला. या ठरावाची प्रत राज्यपाल, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविली जाणार आहे. प्रास्ताविक सहायक गट विकास अधिकारी नितेश माने, संचालन गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे तर विस्तार अधिकारी डी. पी. भोगे यांनी आभार मानले. सभेला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विभाग प्रमुख उपस्थित होते.