शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये गटनेते पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 01:23 IST

संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची वाताहत होत असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र भाजपच्या लाटेतही काँग्रेस स्थिर राहिली आहे.

गडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची वाताहत होत असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र भाजपच्या लाटेतही काँग्रेस स्थिर राहिली आहे. २०१२ पेक्षा एक जागा अधिक जिंकत काँग्रेसने गडचिरोलीचा गड कायम राखला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे १५ सदस्य निवडून आले आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे सहा जि.प. सदस्य गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून सात सदस्य निवडून आले. तर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे या १५ सदस्यातून गटनेता निवडीसाठी चुरस आहे. आमदार वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक अ‍ॅड. राम मेश्राम जेप्रा-विहिरगाव मतदार संघातून निवडून आले आहे. ते गटनेते पदाच्या शर्यतीत आहे. तर जि.प.तील अनुभवाच्या आधारावर धानोरा तालुक्यातून निवडून आलेले मनोहर पाटील पोरेटी हे गटनेते पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. मनोहर पोरेटी यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मृदूभाषी असलेले मनोहर पोरेटी यांनी धानोराचा गड कायम राखण्यात यश मिळविले. काँग्रेसचे १५ सदस्य पक्षांतर्गत तीन गटात विभागलेले असल्याने आनंदराव गेडाम गटाच्या सदस्यांचे समर्थन गटनेता निवडीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पोरेटींचे पारडे जड आहे. सोमवारी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार गडचिरोलीत होणार आहे. त्यानंतरच गटनेते पदासाठी निवड केली जाईल. काँग्रेस सत्तेसाठीही मोर्चेबांधणी करणार असल्याची चर्चा आहे.