शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‎माओवाद्यांच्या अखेरचा गडात पोलिसांची 'गुढी', ‎अतिदुर्गम बंगाडीत २४ तासांत पोलिस ठाणे !

By संजय तिपाले | Updated: March 19, 2026 19:00 IST

Gadchiroli : नक्षलवाद्यांचा शेवटचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि अतिशय दुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील 'बंगाडी' परिसरात गडचिरोली पोलिसांनी १९ मार्च रोजी ऐतिहासिक कामगिरी फत्ते केली.

लोकमत न्यूज नेटवर्क‎गडचिरोली : नक्षलवाद्यांचा शेवटचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि अतिशय दुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील 'बंगाडी' परिसरात गडचिरोली पोलिसांनी १९ मार्च रोजी ऐतिहासिक कामगिरी फत्ते केली. तब्बल १००० सी-६० कमांडोंच्या फौजेसह पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या नक्षल गडात शिरून 'पोलीस मदत केंद्रा'चा गुढी उभारण्यात आली. या मोहिमेमुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली असून, छत्तीसगड सीमेवर आता 'खाकी'ची अभेद्य भिंत उभी राहिली आहे.‎​गेल्या अनेक वर्षांपासून बंगाडी हा भाग सुरक्षा दलांच्या आवाक्याबाहेर होता. या 'सुरक्षा पोकळी'चा फायदा घेत नक्षलवादी येथे आपली समांतर सत्ता चालवत असत. मात्र, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली आखलेल्या 'प्लॅन ११' नुसार, लाहेरीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या या गावात गुरुवारी पहाटेच कमांडोंनी एन्ट्री केली. १८ बीडीडीएस पथके आणि ५०० विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या एका दिवसात या ठिकाणी १५ पोर्टा कॅबिन, वाय-फाय आणि मोबाईल टॉवर उभारून प्रशासनाने आपले अस्तित्व सिद्ध केले. ३१ मार्च पर्यंत माओवाद हद्दपार करण्यासाठी पोलिस यंत्रणा जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे.‎काय आहे या 'मोहिमे'चे वैशिष्ट्य?

‎​बंगाडी केंद्रामुळे आता छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. या केंद्रामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर आता चोवीस तास वॉच राहणार आहे. गुंडेनूर नाल्यावरील पुलाचे काम आणि भविष्यात येथे एसटी बस पोहोचवण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.‎​‎स्थानिकांना साहित्य वाटप 

‎​केवळ चौकी उभारून पोलिस थांबले नाहीत, तर त्यांनी स्थानिक आदिवासींशी संवाद साधला. आयोजित जनजागरण मेळाव्यात साड्या, भांडी, ब्लँकेट आणि तरुणांना फुटबॉल-क्रिकेटच्या किटचे वाटप करण्यात आले. माओवाद्यांच्या दहशतीखाली असलेल्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता विकासाची नवी आशा फुलली आहे.‎​"बंगाडी पोलिस मदत केंद्र हे या भागातील विकासाचे प्रवेशद्वार आहे. रस्ते, पूल आणि मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून हा भाग आता जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जाईल."‎- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली.

English
हिंदी सारांश
Web Title : Police Establish Post in Maoist Stronghold, Bangadi, Within 24 Hours

Web Summary : Gadchiroli police successfully established a police outpost in Bangadi, a Maoist stronghold, within 24 hours. This strategic move aims to curb Naxal activities, improve connectivity, and facilitate development in the region. Locals received essential supplies, fostering hope for progress.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली