हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:25 IST2018-10-11T01:25:37+5:302018-10-11T01:25:55+5:30

तालुक्यातील कुकडी परिसरातील मोहफुलाच्या हातभट्टीवर आरमोरीचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी बुधवारी धाड टाकून मोहफुलाची दारू, सडवा व मोहफुले असा एकूण ३ लाख ४६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Police raid on handcuffs | हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड

हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड

ठळक मुद्देकुकडी परिसरात कारवाई : ३ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील कुकडी परिसरातील मोहफुलाच्या हातभट्टीवर आरमोरीचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी बुधवारी धाड टाकून मोहफुलाची दारू, सडवा व मोहफुले असा एकूण ३ लाख ४६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपी बाळू हेडामी, त्याचा एक साथीदार जंगलात पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुकडी जंगल परिसरात मोहफूल हातभट्टीची दारू काढण्यात येत असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस हवालदार बारसागडे व इतर सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन कोकडी परिसरात सापळा रचला. तेथे सुरू असलेल्या दोन हातभट्ट्यावर धाड टाकली. यावेळी आरोपी बाळू हेडामी (२३) रा.कुकडी व त्याचा एक साथीदार जंगलात पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून २०० लीटर क्षमतेचे २४ ड्रम सडवा, ५४ हजार रूपये किमतीची ४५० लीटर दारू, ४० किलो जवनाचे मोहफुलाने भरलेले ५० पोते असा एकूण ३ लाख ४६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आरमोरीचे ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: Police raid on handcuffs