पोलिसाच्या दुचाकीने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 01:10 IST2017-07-08T01:10:54+5:302017-07-08T01:10:54+5:30
कामावरून आपल्या गावी येवलीकडे सायकलने जात असलेल्या एका इसमाला भरधाव वेगात आलेल्या पोलिसाच्या दुचाकीने

पोलिसाच्या दुचाकीने उडविले
सायकलस्वार ठार : सेमाना चौकातील सायंकाळचा अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कामावरून आपल्या गावी येवलीकडे सायकलने जात असलेल्या एका इसमाला भरधाव वेगात आलेल्या पोलिसाच्या दुचाकीने जबर धडक दिल्याने सायकलस्वार ठार झाला. सुरेश रामुजी कुकडे (४६) रा.येवली असे मृत इसमाचे नाव आहे. हा अपघात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, सुरेश कुकडे हे नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून सायकलने गावाकडे निघाले होते. याचवेळी दुचाकीने (एमएच ३३, जे ३४६८) राकेश चंदू शेडमे रा.दामरंचा हा पोलीस जवान गडचिरोलीच्या दिशेने येत असताना कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या चौकात कुकडे यांच्या सायकलला त्याची जबर धडक बसली. यामुळे कुकडे फेकल्या गेले. गंभीर मार लागल्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती लगेच पोलिसांनी गडचिरोली ठाण्याला दिली. त्यांनी लगेच टोईग व्हॅन पाठवून अपघातग्रस्त दुचाकी आणि सायकल ठाण्यात आणली. दरम्यान मृतकाला लगेच गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर तिथे गावकऱ्यांची गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकशी सुरू होती. धडक मारणारा राकेश शेडमे हा दामरंचा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.