पोलिसांनी केला मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:58+5:30

सिरकोंडा नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. पाईप टाकून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पाण्याबरोबर येणारा गाळ पाईपासमोर जमा झाला होता. काही प्रमाणात पाईप सुद्धा बुजले होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होत होती. परिणामी झिंगानूरसह इतर गावांचा संपर्क तुटत होता. गाळ काढणे आवश्यक झाले होते.

The police cleared the way | पोलिसांनी केला मार्ग मोकळा

पोलिसांनी केला मार्ग मोकळा

ठळक मुद्देरस्त्याची दुरूस्ती : सिरकोंडा नाल्याच्या पुलाखालील गाळ काढला

लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरकडे जाणाऱ्या मार्गावर सिरकोंडाजवळ असलेल्या नाल्याच्या पुलाच्या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने थोडाही पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे रहदारी ठप्प पडत होती. झिंगानूर उपपोलीस स्टेशनच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने पाईपमधील माती काढली.
सिरकोंडा नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. पाईप टाकून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पाण्याबरोबर येणारा गाळ पाईपासमोर जमा झाला होता. काही प्रमाणात पाईप सुद्धा बुजले होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होत होती. परिणामी झिंगानूरसह इतर गावांचा संपर्क तुटत होता. गाळ काढणे आवश्यक झाले होते. बांधकाम विभागाकडे तक्रार केली तरी बांधकाम विभागाकडून यावर वेळीच उपाययोजना होणे अशक्य होते. ही बाब झिंगानूर उपपोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांच्या लक्षात आली. त्यांनी एक खासगी जेसीबी भाड्याने घेतला. पाईपच्या समोर असलेली रेती व गाळ दूर करून पाण्याला मार्ग मोकळा करून दिला. या कामात झिंगानूर व परिसरातील गावकºयांनी सुद्धा मदत केली आहे. मात्र या सर्व बाबीसाठी पोलिसांचे मोठे सहकार्य लाभले आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांच्या अडचणी दूर करण्याचे काम पोलीस करीत असल्याने पोलिसांच्या कार्याची प्रशंसा होत आहे. नाल्यातून सतत पाणी वाहत असल्याने नाल्याजवळचा रस्ता वाहून गेला. दगड बाहेर निघले होते. नागरिकांनी श्रमदान करून हा रस्ता सुद्धा दुरूस्त केला आहे.

उंच पूल बांधण्याची गरज
सिरकोंडा गावाच्या पलिकडे झिंगानूरसह अनेक गावे आहेत. या गावांकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून बस, खासगी वाहने व इतर मालवाहू वाहनांची वर्दळ राहते. सिरकोंडा गावाजवळ असलेल्या नाल्यावरचे पूल कमी उंचीचे आहे. त्यामुळे थोडा मोठा पाऊस झाल्यानंतर पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होऊन रहदारी ठप्प होते व पुढील गावांचा संपर्क तुटते. पावसाळ्यात अनेकवेळा संपर्क तुटत असल्याने या ठिकाणी उंच पूल बांधण्याची गरज आहे.

Web Title: The police cleared the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस