दारू, तंबाखूमुक्तीसाठी पोलीस व मुक्तिपथची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST2021-04-14T04:33:18+5:302021-04-14T04:33:18+5:30
शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत दारूविक्रेत्यांच्या घरी दारू पिण्यासाठी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करणे. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून पाच हजारांचा दंड ...

दारू, तंबाखूमुक्तीसाठी पोलीस व मुक्तिपथची बैठक
शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत दारूविक्रेत्यांच्या घरी दारू पिण्यासाठी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करणे. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून पाच हजारांचा दंड आकारणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर एक हजार २०० रुपयांचा दंड ठोठावणे. किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करणे. अवैध दारू व तंबाखूची तस्करी व विक्री करणाऱ्यांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
गडचिरोली तालुक्यातील अवैध दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरासह पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या भागातील अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कायद्यानुसार कारवाई करीत दारू व तंबाखूमुक्त तालुका निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार म्हणाले. बैठकीत मुक्तिपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, ठाणेदार दामदेव मंडलवार, उपसंचालक संतोष सावळकर, विलास निंबोरकर, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम, गणेश कोलगिरे, आदी उपस्थित होते.