शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

१७४ आरोपींवर पोलीस कारवाई

By admin | Updated: May 6, 2015 01:35 IST

जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहर ठाण्यात कार्यरत पोलिसांनी सन २०१४-१५ या वर्षात ..

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहर ठाण्यात कार्यरत पोलिसांनी सन २०१४-१५ या वर्षात विविध प्रकारच्या १५५ गुन्ह्यांची नोंद करून एकूण १७४ आरोपींवर कायदेशीर पोलीस कारवाई केली आहे. अपघाती मृत्यूचे एकूण २८ गुन्हे नोंद करून इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ३८ बेजबाबदार वाहन चालकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गडचिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सहा बिट असून यामध्ये गडचिरोली शहर कॉम्प्लेक्स, पोर्ला, गोकुलनगर/रामनगर, अमिर्झा व येवली बिटांचा समावेश आहे. दोन बिटामध्ये शहराचा समावेश असून तिसऱ्या बिटात कॉम्प्लेक्स परिसरातील गावांचा समावेश आहे. उर्वरित बिट मिळून एकूण ७५ गावांचा भार गडचिरोली पोलीस ठाण्यावर आहे.शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध प्रकारचे अनेक गुन्हे घडत असतात. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून आरोपींवर कारवाई करण्याचे काम पोलीस ठाण्याच्या वतीने होत असते. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या वर्षभराच्या कालावधीत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनयभंगाचे सात गुन्हे घडले असून पोलिसांनी आठ आरोपींवर कारवाई केली आहे. बलात्काराचे चार गुन्हे घडले असून चार आरोपींवर कारवाई झाली आहे. चोरीचे ३१ गुन्हे घडले असून नऊ आरोपींवर कारवाई झाली आहे. महिलांवरील अत्याचार, किरकोळ अपघात शिविगाळ बाबतचे एकूण ३६ गुन्हे घडले असून ४६ आरोपींवर कायदेशीर कारवाई झाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाणीतून दुखापत झाल्याचे ११ गुन्हे घडले असून २१ आरोपींवर कारवाई झाली असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून १४ लाखांचा दंड वसूलवाहतूक शाखा गडचिरोलीच्या वतीने १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या एक वर्षाच्या कालावधीत अवैध वाहतुकी प्रकरणी एकूण १२ हजार १२१ गुन्हे दाखल करण्यात आले. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १२ हजार १२१ वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांनी एकूण १४ लाख ५९ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. शहर वाहतूक पोलिसांनी परवाना क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतुकीप्रकरणी १३० गुन्हे नोंदविले असून वर्षभरात एक लाख ४५ हजार ६०० रूपयांचा दंड वाहनचालकांकडून वसूल केला आहे. परवाना कागदपत्रे तसेच नंबर प्लेट, हेल्मेट नसलेल्या व ओव्हरलोड वाहतुकी संदर्भात वर्षभरात ११ हजार ९९१ गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातून वर्षभरात १३ लाख १३ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.