सेमाना उद्यानात आढळला विषारी फुरसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 10:29 PM2019-07-14T22:29:23+5:302019-07-14T22:30:20+5:30

अत्यंत जहाल विषारी सांपांच्या वर्गातील फुरसे साप गडचिरोली नजीकच्या सेमाना देवस्थान परिसरातील उद्यानात शनिवारी आढळून आला. सापाबाबतची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. त्यानंतर सापाचे निरीक्षण करून त्याला सुरक्षितरित्या परिसरातच सोडून देण्यात आले.

The poisonous phauses found in the garden of Siemna | सेमाना उद्यानात आढळला विषारी फुरसे

सेमाना उद्यानात आढळला विषारी फुरसे

Next
ठळक मुद्देअत्यंत जहाल : परिसरातील जंगलात सोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अत्यंत जहाल विषारी सांपांच्या वर्गातील फुरसे साप गडचिरोली नजीकच्या सेमाना देवस्थान परिसरातील उद्यानात शनिवारी आढळून आला. सापाबाबतची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. त्यानंतर सापाचे निरीक्षण करून त्याला सुरक्षितरित्या परिसरातच सोडून देण्यात आले.
राज्यात नाग, मण्यार, घोणस, फुरसे आदी विषारी साप आढळतात. गडचिरोली जिल्ह्यात फुरसे साप क्वचितच आढळून येतो.
१ फुट ४ इंच ते २ फुट ५ इंचपर्यंत या सापाची लांबी असते. अत्यंत विषारी असलेला हा साप सेमाना उद्यानात वृक्ष लागवडीचे काम करीत असलेल्या मजुरांना दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती वन कर्मचाऱ्यांना दिली. वन कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र अजय कुकुडकर यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनास्थळी बोलाविले. कुकुडकर यांनी सापाचे निरीक्षण केले असता. सदर साप फुरसे (साव स्केल्ड व्हायपर) असल्याचे समजले. निरीक्षणानंतर सदर सापाला परिसरातील जंगलात सुरक्षितरित्या सोडून देण्यात आले. याप्रसंगी क्षेत्रसहाय्यक प्रमोद जेनेकर, वनरक्षक दिलीप धुर्वे, वनमजूर ज्ञानेश्वर चुधरी, संतोष मेश्राम उपस्थित होते. विशेष म्हणजे, ७-८ वर्षांपूवी आरमोरी व आष्टी परिसरात हा साप आढळून आला होता. गडचिरोली शहर परिसरात प्रथमच हा विषारी साप आढळून आला, अशी माहिती सर्पमित्र अजय कुकुडकर यांनी दिली.

Web Title: The poisonous phauses found in the garden of Siemna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :snakeसाप