Poisoning from spraying; The death of two farmers | फवारणीतून विषबाधा; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
फवारणीतून विषबाधा; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

गुड्डीगुडम (गडचिरोली) : कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर जेवण केल्यावर विषबाधा होऊन दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरातील झिमेला गावात ही घटना घडली.
गंगा चिनू आत्राम (५०), मल्ला लचमा सडमेक (५५ दोघेही रा. झिमेला) अशी मृतांची नावे आहेत. मलय्या आत्राम (६०) याच्यावर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंगा आत्राम यांच्या शेतात रबी पिकाची पेरणी केली आहे. पिकावर कीड लागल्याने तिघेहीजण फवारणी करण्यासाठी शेतात गेले होते. शेताजवळ असलेल्या तलावातील मासे पकडून शेतातच स्वयंपाक केला. फवारणीचे काम आटोपल्यानंतर तिघांनीही जेवण केले. जेवणानंतर अर्ध्या तासातच तिघांचीही प्रकृती बिघडली. आत्राम आणि सडमेक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
फवारणीदरम्यान स्वयंपाक करताना व्यवस्थित हात न धुताच स्वयंपाक केल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Web Title: Poisoning from spraying; The death of two farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.