शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

युवा सेनेतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

गडचिरोली, कुरखेडा, वडसा येथे युवा सेनेच्या वतीने शनिवारी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात शनिवारी वृक्षारोपण करण्यात आले.

गडचिरोली : गडचिरोली, कुरखेडा, वडसा येथे युवा सेनेच्या वतीने शनिवारी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात शनिवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, राजू कावळे, वासुदेव शेडमाके, शहरप्रमुख संतोष मारगोनवार, नंदू कुमरे, अविनाश जीवतोडे, तेजस नरड, नयन कहाडे, प्रशांत देवगिरवार, रोहित निपाने उपस्थित होते. यावेळी रूग्णांना फळांचे वाटपही करण्यात आले. यावेळी सुरेंद्रसिंह चंदेल यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कुरखेडा येथे वडसा मार्गावर मोहबंशी यांच्या पेट्रोलपंप परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, जि. प. सदस्य निरांजनी चंदेल, अशोक इंदूरकर, पं. स. उपसभापती बबन बुद्धे, आशिष काळे, अशोक कंगाली, नरेंद्र तिरणकर, रोशन सय्यद, अज्जू सय्यद, पुंडलिक देशमुख, संजय देशमुख, रमेश कुथे, पुरूषोत्तम तिरगम उपस्थित होते. यावेळी कडुलिंब, आवळा, आंबा आदी वृक्षांची लागवड करण्यात आली.
वडसा येथे शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला विजय बुल्ले, सिचन वानखेडे, नंदू चावला, विठ्ठल धोटे, बालाजी ठाकरे, विश्वनाथ सहारे, शंकर चांदेवार, जगदीश परसवानी, देवराव बेंदरे, सुनील दुनेदार, दयाराम उरकुडे, विलास बुरांडे, वासुदेव मेश्राम, प्रवीण तुपट, सूरज गजभिये, गुणवंत हेडाऊ आदी उपस्थित होते. यावेळी रुग्णालयात रुग्णांना बिस्किट व फळ याचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.