जमीन आराेग्यानुसार पीक नियाेजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST2020-12-07T05:00:00+5:302020-12-07T05:00:16+5:30
कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, कृषी विभाग गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी जागतिक मृदादिन माेहगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून मानकर बाेलत हाेते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, वरिष्ठ जवस पैदासकार डाॅ. बिना नायर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक संदीप कऱ्हाळे, सहयाेगी प्राध्यापिका डाॅ. शालिनी बडगे, धानाेराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, डाॅ. जीवन कताेरे, कृषी सहायक दिनेश पानसे, देवसाय आतला उपस्थित हाेते.

जमीन आराेग्यानुसार पीक नियाेजन करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
धानाेरा : अधिक उत्पादनाकरिता पेरणीपूर्व प्रत्येक शेतकऱ्यानेे शेतातील मातीची तपासणी करावी. तपासणी अहवालानुसारच धान पिकाकरिता खत मात्रेचे नियाेजन करावे. यामुळे खताचा अनावश्यक वापर टळून जमिनीचे आराेग्य टिकविता येईल. जमीन आराेग्य पत्रिकेनुसारच पिकांचे नियाेजन करावे, असे आवाहन डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेलाचे शिक्षण विस्तार संचालक डाॅ. डी. एम. मानकर यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, कृषी विभाग गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी जागतिक मृदादिन माेहगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून मानकर बाेलत हाेते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, वरिष्ठ जवस पैदासकार डाॅ. बिना नायर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक संदीप कऱ्हाळे, सहयाेगी प्राध्यापिका डाॅ. शालिनी बडगे, धानाेराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, डाॅ. जीवन कताेरे, कृषी सहायक दिनेश पानसे, देवसाय आतला उपस्थित हाेते.शेतातील काडीकचरा, धसकटे, पालापाचाेळा खड्ड्यांमध्ये दाबून कंपाेस्ट खत निर्मिती करावी, तसेच शासकीय याेजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाॅ. मानकर यांनी केले. उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी स्वत:च्या आराेग्याप्रमाणे जमिनीच्या आराेग्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. सेंद्रीय खताचा वापर करावा, असे आवाहन केले. बिना नायर यांनी मृदा परीक्षणाचे फायदे पटवून देत शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले. डाॅ. विक्रम कदम यांनी शेतीस जाेड व्यवसाय म्हणून कुकुटपालन व चारापीक याविषयी माहिती दिली. डाॅ. जीवन कताेरे यांनी जवस पिकाची माहिती दिली. आनंद पाल यांनी कृषी विभागाच्या याेजनांविषयी माहिती दिली. अखिल भारतीय समन्वयीत जवस संशाेधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर, आदिवासी उपप्रकल्प अंतर्गत ३५ शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकांचे वितरण करण्यात आले. तसेच जमीन आराेग्य पत्रिकांचेही वाटप झाले. कार्यक्रमाचे आभार ज्ञानेश्वर ताथाेड यांनी मानले.
सुपिकतेसाठी हिरवळीची खते वापरा
दिवसेंदिवस जमिनीचा पाेत खालावत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम हाेत आहे. जमिनीचा पाेत वाढविण्यासाठी सेंद्रीय शेती कसणे आवश्यक आहे. याप्रसंगी समन्वयक संदीप कऱ्हाळे यांनी माती नमुने कशा प्रकारे गाेळा करावीत याविषयी माहिती दिली. जमिनीत एकूण १६ अन्नद्रव्य घटक असतात. त्यात मुख्य अन्नघटकांची पूर्तता करणे गरजेचे आहे. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी गांडूळ खत, हिरवळीची खते तसेच धेंचा, बाेरू, गिरीपुष्प, सुबाभुळ, शेवरी आदी वनस्पती चिखलणीत गाडाव्या, असे मार्गदर्शन कऱ्हाळे यांनी केले.