शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप वाहनाची दुचाकीला धडक, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क धानाेरा : धानाेरा-मुरुमगाव मार्गावर सालेभट्टी गावाजवळ पिकअप या मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील युवक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

धानाेरा : धानाेरा-मुरुमगाव मार्गावर सालेभट्टी गावाजवळ पिकअप या मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील युवक व युवती गंभीर जखमी झाल्याची घटना २७ जानेवारी रोजी सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास घडली. स्वप्निल राजीराम तुलावी (रा. चव्हेला, ता. धानोरा) व मामिता निखिल किरंगे (रा. खेडी (येरकड), ता. धानोरा) अशी जखमींची नावे आहेत.

एम एच ३३-यू ०५४८ या दुचाकी वाहनाने अपघातग्रस्त युवक-युवती येत होते. प्राप्त माहितीनुसार सदर युवती ही धानोरा येथील आय.टी.आय.मध्ये ड्रेस मेकिंगचे प्रशिक्षण घेत आहे, तर युवक हा डब्बा या गावी बांबू तोडण्याचे काम करतो. ताे तेथेच राहत होता. सदर युवक काही कामानिमित्त धानोरा येथे आला होता. मुरुमगावाकडे जाणारी शेवटची बस ४.१५ वाजता आहे. त्यानंतर त्या मार्गाने जाण्यास दुसरे साधन नाही. ती शेवटची बस सुटल्याने त्याच मार्गाने जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीवर बसून दोघे बस पकडण्यासाठी बसचा पाठलाग करीत जात होते. परंतु, सालेभट्टीजवळ वळणावर बसला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या पिकअपची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. युवतीचा पाय फ्रॅक्चर झाला असून, कंबर व डोक्याला मार लागल्याने दोघांनाही धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचारानंतर गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. पिकअप वाहन धडक मारून पसार झाले, त्यामुळे नंबर मिळाला नाही.