शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

माल वाहतुकीस मिळाली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. आता सदर निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यात जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली. मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या सार्वजनिक सेवेसह खासगी सेवेवरील बंदी कायम आहे.

ठळक मुद्देप्रवासी वाहतुकीवरील निर्बंध कायम : जिल्ह्यात कोरोनाबाधित नाहीच, उपाययोजनांमुळे स्थिती नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित जिल्ह्यांमधून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी (जवळपास ६ हजार) असली तरी अद्याप प्रत्यक्षात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. कोरोना नियंत्रणासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांमुळे स्थिती नियंत्रणात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. आता सदर निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यात जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली. मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या सार्वजनिक सेवेसह खासगी सेवेवरील बंदी कायम आहे.जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी फौजदारी प्रक्रि या संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून आपल्या आधीच्या आदेशात अंशत: सुधारणा केली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण क्षेत्रात जीवनाश्यक वस्तुंसह इतर सर्व वस्तुंच्या वाहतुकीस नेहमीप्रमाणे परवानगी दिली आहे. मात्र या मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून मानवी वाहतुकीस प्रतिबंध राहणार आहे. एसटी महामंडळाच्या बसेस व खासगी बसेस, एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणाºया सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. चालकाव्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तींसाठी टॅक्सी, तर एका प्रवाशासह ऑटोरिक्षा वाहतूक करता येणार आहे. खासगी वाहन वाहतुकीसासाठी वाहन चालकाव्यतिरिक्त केवळ एका व्यक्तीला उपयोगात आणता येईल. वाहनांचे चालक व वाहक यांच्या भोजन व्यवस्थेकरीता योग्य ढाब्यावर प्रत्यक्ष जेवन न करता पार्सलद्वारे भोजन व्यवस्था करण्यासंदर्भात तहसीलदारांनी उपाययोजना करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शिवभोजन देणाºया संस्थांंनी एका टेबलवर एक व्यक्ती याप्रमाणे बसण्याची व्यवस्था करून हॉटेल सुरू ठेवावे. मात्र या व्यतिरीक्त बाकी सर्व हॉटेल बंद राहतीलयापूर्वी निर्गमित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशातील अटी व शर्ती/निर्देश कायम राहतील, असे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक सिंगला यांनी कळविले. जिल्ह्यात आतापर्यंत २३ जणांना संशयमुक्त करण्यात आले आहे.१० लोकांना टाकले विलगीकरण कक्षातकोरोनाबाधित जिल्ह्यांमधून आलेल्या जवळपास ६ हजार लोकांना त्यांच्या घरातच इतर लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहण्याचा (होम क्वॉरंटाईन) सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्यावर हातांवर तसे शिक्केही मारण्यात आले. मात्र तरीही सूचनांचे पालन न करता बाहेर फिरणाºया १० जणांना देसाईगंज येथील विलगिकरण कक्षात टाकण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी दिली. इतर सर्व ठिकाणचे विलगिकरण कक्ष सध्या रिकामे आहेत.किराणा दुकानांसाठी १० ते ३ ची वेळजीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडणाऱ्या किराणा सामानाच्या विक्रीसाठी गडचिरोलीत दुकानदारांना सकाळी १० ते ३ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. याशिवाय नियमित ग्राहकांना किराणा सामान घरपोच देण्याची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्यांना किंवा दुकानांमधील कर्मचाऱ्यांना बाहेर काही अडचण येऊ नये म्हणून ओळखपत्र देण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक