भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महिलांची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:38 IST2021-04-07T04:38:07+5:302021-04-07T04:38:07+5:30
येथील आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व महिला ...

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महिलांची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी
येथील आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व महिला सबलीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांची भूमिका या विषयावर आभासी पद्धतीने आयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी भारतीय स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वाटचाल ही सर्व देशभक्त भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असून राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी व राष्ट्र सेवेला प्रवृत्त करण्यासाठी महाविद्यालय नेहमीच अग्रणी राहिलेलं आहे व पुढेही राहील असे आश्वासित केले.
वेबिनार आयोजन सचिव व रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. निहार बोदेले यांनी प्रास्ताविकातून वेबिनार आयोजनाच्या उद्देशांवर प्रकाश टाकला. प्रा. डॉ. श्रीराम गहाणे यांनी संपूर्ण सूत्रसंचालन केले. सहसमन्वयक व रासेयो सह कार्यक्रमाधिकारी प्रा. निलेश हलामी यांनी आभार मानले. वेबिनारला भारतातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.