गडचिरोलीकरांनो, या व्हॉट्सॲपवर नंबरवर 'Hi' पाठवा आणि मिळवा आपत्तीची तातडीने माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:36 IST2025-06-20T18:34:42+5:302025-06-20T18:36:47+5:30
QR कोड स्कॅन करा, सुरक्षित राहा : गडचिरोलीत चॅटबोट सेवा सुरु

People of Gadchiroli, send 'Hi' to this WhatsApp number and get immediate information about the disaster!
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित माहिती सहज मिळावी, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांच्यातर्फे आधुनिक चॅट बोट प्रणाली सुरू केली आहे. क्यूआर स्कॅन करून, तसेच व्हॉट्सअॅपद्वारेही नागरिक पूर, पाण्याविषयी माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.
या प्रणालीचा प्रारंभ १८ जून रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केला. अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नीलेश तेलतुंबडे, सहायक महसूल अधिकारी स्वप्नील माटे व पूर समन्वय अधिकारी गोपीचंद गव्हारे उपस्थित होते.
ही प्रणाली व्हॉट्सअॅपवर आधारित असून, जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरणांचा विसर्ग, नदीच्या पाणीपातळीची सद्य:स्थिती, हवामान अंदाज, संपर्क तुटलेली गावे व शहरे, बंद रस्त्यांची यादी, प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना, विजेपासून बचावाच्या उपाययोजना आदीबाबतची अद्ययावत व अधिकृत माहिती सहज मिळवता येईल.
हा नंबर करा सेव्ह
नागरिकांनी ८२७५३७१४८५ हा क्रमांक DDMA Gadchiroli या नावाने मोबाइलमध्ये सेव्ह करावा व व्हॉट्सअॅपवर 'Hi' असा मेसेज पाठवावा. त्यानंतर मिळालेल्या मेनूमधून हवी असलेली माहिती निवडता येते. QR कोड स्कॅन करूनही हा क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह करता येतो.
येथेही मिळवता येईल माहिती
- यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेलला https://whatsapp.com/channel/0029VbAPkzTKGGG8KdTvgY41 या लिंकवरून फॉलो करता येईल.
- या प्रणालीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.