शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कोठी भागातील समस्यांकडे लक्ष द्या!

By admin | Updated: April 6, 2017 01:41 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर आरोग्य,

पोलीस अधीक्षकांना साकडे : जनसंपर्क बैठकीतून पोलिसांकडे आल्या तक्रारी गडचिरोली : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर आरोग्य, शिक्षण आदीबाबत समस्या आहेत. या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी ३ एप्रिल रोजी कोठी येथे पार पडलेल्या पोलीस विभागाच्या जनसंपर्क बैठकीत केली. त्या अनुषंगाने कोठी पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना पत्र लिहून या समस्यांची माहिती दिली आहे. भामरागड तालुक्याचा संवेदनशील व अविकसित भाग असलेल्या कोठी येथे पोलीस मदत केंद्राच्या पुढाकाराने ३ एप्रिल रोजी जनसंपर्क मेळावा घेण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांनी आपल्या अडचणी पोलीस अधिकाऱ्यांकडे मांडल्या. कोठी हे गाव तालुक्यापासून सर्वात लांब अंतरावर असलेले दुर्गम गाव आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने व रुग्णवाहिकेचे वाहन नसल्यामुळे मोठ्या आजाराच्या रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे येथे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. कोठी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद भरण्यात यावे व एक रुग्णवाहिका मंजूर करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासोबतच शासकीय आश्रमशाळा कोठी येथे वर्ग १ ते १० मधील शिक्षकांची संख्या कमी असल्याने मुलांना शैक्षणिक अध्यापनाच्या कामात अडचण निर्माण झाली आहे. अनेकांना शिकविलेच जात नाही. त्यामुळे कोठी शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची पदे तत्काळ भरण्यात यावी, असेही या ग्रामस्थांनी म्हटले आहे. शासनाच्या सोयीसुविधेपासून हा भाग वंचित आहे. या समस्यांचे निराकरण करून शासनाप्रती नागरिकांमधील विश्वास वृंद्धीगत करावा, अशी मागणीही या नागरिकांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर कोठी पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. आता आदिवासी विकास व आरोग्य विभाग काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)