व्यावसायिक शेतीकडे लक्ष द्या
By Admin | Updated: July 1, 2014 23:29 IST2014-07-01T23:29:16+5:302014-07-01T23:29:16+5:30
अॅपल बोरसारख्या फळपिकाची लागवड करून शेतकरी आपला आर्थिक स्तर उंचवावा, कमी कालावधीमध्ये जास्त नफा देणाऱ्या पिकावर भर द्यावा, व्यावसायीक शेतीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे,

व्यावसायिक शेतीकडे लक्ष द्या
कृषी दिन साजरा : जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतींचे शेतकऱ्यांना आवाहन
गडचिरोली : अॅपल बोरसारख्या फळपिकाची लागवड करून शेतकरी आपला आर्थिक स्तर उंचवावा, कमी कालावधीमध्ये जास्त नफा देणाऱ्या पिकावर भर द्यावा, व्यावसायीक शेतीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रनेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी दिन कार्यक्रमात ते मंगळवारी बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रमात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कृषी सभापती अतुल गण्यारपवार, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विठ्ठल कुडमुलवार, जि.प.च्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शामराव कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर, मनरेगाचे समन्वयक एस. पी. पडघन, जिल्हा कृषी अधिकारी शेरेन पठाण, कावेरी राजपूत आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. यावेळी कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी प्रास्ताविक केले तर संचालन एस. पी. पडघन यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)