शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसह पालकांनी तंत्रस्नेही होणे आवश्यक

By admin | Updated: March 6, 2016 00:57 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी डिजीटल शाळेची गरज आहे.

संदीप गुंड यांचे प्रतिपादन : डिजीटल स्कूल प्रेरणा कार्यशाळा उत्साहातगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी डिजीटल शाळेची गरज आहे. तंत्रज्ञानातून शैक्षणिक अध्यापन व अध्ययनाची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्यासाठी शिक्षकांसह पालकांनी तंत्रस्नेही होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्यातील पास्टेवाडा जि. प. शाळेचे शिक्षक संदीप गुंड यांनी केले. डायट गडचिरोली, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन, नावीण्यपूर्ण उपक्रम कक्ष, द यूथ समूह, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व तंत्रस्नेही मित्र गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी येथील गोंडवाना कलादालनात आयोजित डिजीटल प्रेरणा कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, डायटचे अधिव्याख्याता धनंजय चापले, वैद्य, ठाणे जिल्ह्यातील केंद्रप्रमुख महेंद्र भिमटे, जि. प. चे प्रभारी उपशिक्षणाधिकारी उकंडराव राऊत आदी उपस्थित होते. पुढे बोलताना संदीप गुंड म्हणाले, जि. प. शाळांची गुणवत्ता वाढण्यासाठी विद्यार्थ्यांची वर्गात मानसिक उपस्थिती असणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांचे अध्यापन प्रभावी असणे गरजेचे आहे. अध्यापनादरम्यान ज्या शिक्षकाला विद्यार्थ्यांचे लक्ष खिळवून ठेवता येते. त्यालाच गुणवत्ता साध्य करता येते. विद्यार्थ्यांना स्क्रीन आवडत असल्यामुळे एलसीडी प्रोजेक्ट व टॅबद्वारे शिक्षकांनी वर्गात अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाबाबत आवड निर्माण होईल. खडू-फळ्याच्या वापरापेक्षा ई-लर्निंग प्रचंड प्रभावी माध्यम होते, असेही गुंड यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम डिजीटल शाळा म्हणून उदयास आलेल्या पास्टेवाडा जि. प. शाळेतील डिजीटल अध्यापन व अध्ययन पद्धतीची माहिती दिली. याशिवाय ई-लर्निंगमधील सॉप्टवेअर, अ‍ॅप्स व प्रोजेक्टरच्या विविध मॉडेलची सखोल माहिती दिली.कार्यशाळेला जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आदींसह जवळपास २५० शिक्षक उपस्थित होते. यावेळी इतर मान्यवरांनीही ज्ञानरचनावाद, ई-लर्निंग व डिजीटल शैक्षणिक तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. संचालन सुधीर गोहणे यांनी केले तर आभार राकेश सोनटक्के यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी राजेश दरेकर, गुलाब मने यांच्यासह जि. प. शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)