शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

'अपार आयडी' नको, आश्रमशाळेतील २११ विद्यार्थ्यांना घेऊन पालक घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:38 IST

संभ्रम दूर करा : मुख्याध्यापकांचे प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली / अहेरी : विद्यार्थ्यांची स्वतंत्र डिजिटल ओळख निर्माण व्हावी, यासाठी 'अपार आयडी' म्हणजे ऑटोमेटेड परमानेंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री क्रमांक बनविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. तथापि, आदिवासी पालकांमध्ये 'अपार आयडी'वरून गैरसमज आहेत. आदिवासी आश्रमशाळेत शिकत असलेल्या २११ पाल्यांना घेऊन पालक २३ डिसेंबरला घरी गेले. त्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. एटापल्ली तालुक्यात हा प्रकार घडला आहे.

एटापल्लीच्या पंदेवाहीतील विनोबा प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेत कसनसूर, हालेवरा, बुर्गी, गट्टा, गर्दैवाडा, गट्टागुडा, ताडगुडा, हालूर, बांडे, मर्दाकुही, मुरेवाडा, गिलनगुडा, वट्टेली, मोडस्के, जवेली, झारेवाडा आदी गावांतील मुले-मुली शिकतात. एकीकडे अपार आयडी काढण्याचे शासनाचे निर्देश असून १०० टक्के अपार आयडी काढण्याबाबत शिक्षक अधिकारी आणि यंत्रणेवर दबाव आहे. मात्र, पालकांच्या विरोधामुळे अपार आयडी काढण्यास अडचणी येत असून, अनेक आश्रमशाळांची पटसंख्या दररोज कमी होत आहे. 

दररोज शाळेतून पालक आपल्या पाल्यांना अपार आयडीच्या भीतीने घरी नेत आहेत. याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अधिकारी भामरागड यांना पत्र लहून कळविले असून, विद्यार्थी आदिवासी नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 

संमतीशिवाय आयडी काढल्यास गुन्हा नोंदवू दरम्यान, काही पालकांनी शाळेला लेखी पत्र लिहून संमतीशिवाय अपार आयडी काढली किंवा विद्यार्थ्यांना कुठली लस परस्पर दिल्यास विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे शिक्षक धास्तावले असून अपार आयडी बनविण्याचे काम प्रभावित झाले आहे.

शिक्षण विभागाचे पाहतो, करतो...जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. पाहतो, करतो, अशी त्यांची उत्तरे आहेत. असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आणणाऱ्यांनाच ते शहाणपणाचे डोस देत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित आश्रमशाळा ही आदिवासी प्रकल्पाअंतर्गत असल्याचे सांगून हात झटकण्याचाही प्रयल होत आहे. त्यामुळे अपार आयडीसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला खीळ बसण्याची शक्यता आहे. सीईओ आयुषी सिंह यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीEducationशिक्षण