नक्षल बॅनरमुळे दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:30 IST2018-03-15T00:30:29+5:302018-03-15T00:30:29+5:30
मुरूमगाव-कटेझरी दरम्यानच्या मार्गावर नक्षल्यांनी लाल रंगाचे बॅनर लावले. विशेष म्हणजे कटेझरी येथीलच एका इसमाची नक्षल्यांनी मंगळवारी दुपारी हत्या केली.

नक्षल बॅनरमुळे दहशत
ऑनलाईन लोकमत
धानोरा : मुरूमगाव-कटेझरी दरम्यानच्या मार्गावर नक्षल्यांनी लाल रंगाचे बॅनर लावले. विशेष म्हणजे कटेझरी येथीलच एका इसमाची नक्षल्यांनी मंगळवारी दुपारी हत्या केली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बॅनरमध्ये महिलांच्या लढाऊ वृत्तीचे प्रतीक असलेला आंतराष्टÑीय महिला दिन साजरा करावा, महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज आहे. केंद्र व राज्य शासन तसेच अधिकारी व कर्मचारी सांप्रदायिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाच्या विरोधात आंदोलन उभारावे, असे आवाहन बॅनरमधून केले आहे. सदर बॅनर लाल रंगाचे असून त्यावर टिपागड एरिया कमिटी असा उल्लेख करण्यात आला आहे.