भामरागड उपविभागातील कोठी येथील पोलीस मदत केंद्राच्या दोन जवानांवर नक्षवाद्यांनी गोळीबार केल्याने एक पोलीस जवान शहीद झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी कोठी गावात घडली. ...
धानोरा येथील बांधकाम विभागीय कार्यालयातील अधिकारी व्ही. एस. चवंडे ७ जुलैैपासून रजेवर आहेत. ते रजेवर गेल्याने त्यांच्या कार्यालयाचा प्रभार कोरची येथील उपविभागीय बांधकाम अधिकारी धार्मिक यांच्याकडे देण्यात आला. विशेष म्हणजे धार्मिक यांच्याकडे आधीच कुरखे ...
प्रशासनाच्या नियमानुसार ई-पास न काढताच जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. याशिवाय रेड झोनमधून येताना ई-पास काढून आल्यानंतरही योग्य ती खबरदारी न घेता समाजात बिनधास्तपणे वावरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परंतू प्रशासनाने कारवाईचा फास आवळला नसल्यामुळ ...
एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी निर्माण होत असलेल्या नवीन शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत सुरूवातीला विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. परंतु तालुक्यात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने विलगीकरण कक्षाचे रूपांतर कोरोना केअर सेंटरमध्य ...
गडचिरोली शहराचा सिटी सर्व्हे झाला नसल्याने नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होत आहेत. सिटी सर्व्हे करण्यासाठी नगर परिषदेने ४ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी भूमिअभिलेख कार्यालयाला देण्याचा करार केला आहे. त्यापैकी ५० लाख रुपयांचा निधी दिला ...
गडचिरोली जिल्ह्यात जानेवारीपासून जुलैपर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेण्यात आली. त्या अपघातांमध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. ...
सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातून या ...
गेल्या २५ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी सामान्य लोकांची गैरसोय होत आहे. कोरोना विरूद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती जवळपास ८० टक्के लोकांनी दाखविली आहे. १५ टक्के ल ...
जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विविध समस्यांमुळे शिक्षक त्या भागात जाण्यास तयार नसतात. गेले तरी तेथून लवकर बाहेर पडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आता आंतरजिल्हा बदल्यांमुळे दुर्गम भागातील शिक्षकांचा अनुशेष अजून वाढला आहे. विशेष म्हणजे अजून जिल्ह्य ...
आतापर्यंत बाहेरून आलेल्या आणि संस्थात्मक विलगिकरणात असलेल्याच लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह येत होता. मात्र आता विलगिकरणात नसलेल्या नागरिकांमध्येही पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्यामुळे अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुक्त झाल्याने सुटी दिलेल्य ...