आजपासून सिटी सर्व्हेला पुन्हा सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:02+5:30

गडचिरोली शहराचा सिटी सर्व्हे झाला नसल्याने नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होत आहेत. सिटी सर्व्हे करण्यासाठी नगर परिषदेने ४ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी भूमिअभिलेख कार्यालयाला देण्याचा करार केला आहे. त्यापैकी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

City Survey resumes today | आजपासून सिटी सर्व्हेला पुन्हा सुरूवात

आजपासून सिटी सर्व्हेला पुन्हा सुरूवात

Next
ठळक मुद्देविसापूर वार्डातून प्रारंभ : लॉकडाऊनमुळे थांबले होते काम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भूमिअभिलेख कार्यालयामार्फत गडचिरोली शहरात सिटी सर्व्हेच्या कामाला पुन्हा मंगळवारपासून सुरूवात होणार आहे. विसापूर वार्डातून या कामाची सुरूवात केली जाणार आहे.
गडचिरोली शहराचा सिटी सर्व्हे झाला नसल्याने नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होत आहेत. सिटी सर्व्हे करण्यासाठी नगर परिषदेने ४ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी भूमिअभिलेख कार्यालयाला देण्याचा करार केला आहे. त्यापैकी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. जानेवारी महिन्यात सिटी सर्व्हेच्या कामाला सुरूवात झाली होती. देवापूर रिठच्या सर्वेचे काम पूर्ण झाले. चौकशी शिल्लक आहे. लॉकडाऊनमुळे सिटी सर्व्हेचे काम थांबले होते. आता लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली असल्याने भूमिअभिलेख कार्यालयाने सर्व्हेचे काम सुरू केले आहे.
गडचिरोली शहरात गावठाण जमिनीवर वसलेल्या अंदाजे २२ हजार २५० घरांच्या जागेचा सर्व्हे केला जाणार आहे. सर्वेनंतर संबंधित जमीनधारकाला मिळकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सदर मिळकत प्रमाणपत्र घरकूल योजना व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. विसापूर वार्डात मंगळवारपासून कामाला सुरूवात होणार आहे. नागरिकांनी भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक केशव निंबोड यांनी केले आहे.

केवळ सहा मोबाईल टॉवर अनधिकृत
शहरात अनेक वर्षांपासून मोठ्या दिमाखात उभे असलेल्या अनेक अनधिकृत मोबाईल टॉवरबाबतचे वृत्त आठवड्याभरापूर्वी ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने दखल घेत टॉवरची तपासणी करण्याचे निर्देश नगर परिषदेच्या नगर रचना विभागाला दिले होते. त्यानुसार केलेल्या सर्वेक्षणात केवळ सहा मोबाईल टॉवर अनधिकृत आढळल्याचे नगररचना विभागाने सांगितले. त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

Web Title: City Survey resumes today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.