Gadchiroli News व्यंकटापूर उपपोलीस स्टेशनतर्फे ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून लर्निंग लायसन्स मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील ३, अहेरी ६ व ब्रह्मपुरी आगारातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...
डिझेलचे भाव वाढल्यास निर्मितीचा खर्च वाढतो तसेच वाहतुकीच्या खर्चात भर पडत असल्याने डिझेलच्या वाढीबराेबरच वस्तूंच्या किमतीही वाढविल्या जातात. एवढेच नाही तर प्रवासी भाडेसुद्धा वाढविले जाते. दरवाढीमागे कारण विचारल्यास पेट्राेल व डिझेलचे भाव वाढल्याने दर ...
गडचिराेली आगारात दर दिवशी एसटीच्या ५५० फेऱ्या राहतात तर अहेरी आगाराच्या दरदिवशी २६० फेऱ्या राहतात. गडचिराेली आगारातून दरदिवशी जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त हाेते तर अहेरी आगारातून ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असल्य ...
गाेंडपिंपरी मार्गे चारचाकी वाहनाने आष्टी येथे दारू आणली जात असल्याची गाेपनीय माहिती मिळाली. आष्टी चेक पोस्ट फाॅरेस्ट नाक्यावर नाकाबंदी करून एमएच ३३ व्ही ७१५१ क्रमांकाचे बोलेरो वाहन थांबवून चाैकशी केली असता, त्यामध्ये देशीदारूच्या ५० पेट्या आढळून आल्य ...
मुरूमगाव परिसरातील हिरवेकंच जंगल, आंघाेळ करण्यासाठी तलाव, बाेड्या उपलब्ध असल्याने पंधरा दिवसांपूर्वी गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलेल्या हत्तींनी याच ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. अधूनमधून हत्तींचा कळप गावामध्ये प्रवेश करून घरांचे नुकसान कर ...
महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या मधोमध बेटावर अनेक वर्षांपासून हे गाव वसले आहे. अहेरी तालुक्यात येत असलेल्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत या गावाचा समावेश होतो. मात्र मेट्रो, बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गावातील माण ...
भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या काल ...
दिवाळी सणानिमित्त गेल्या ८ ते १० दिवसांपासून गडचिराेली शहराच्या सर्व भागांतील बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. त्रिमूर्ती चाैक, मुख्य बाजारपेठ, सराफा बाजारपेठ, तसेच चामाेर्शी, आरमाेरी, धानाेरा व मूल या प्रमुख मार्गावरील दुकानांमध्ये दिवाळी सणाला ...
आता नेत्यांच्या नाही तर जनतेच्या शिफारशीने तिकीट मिळेल, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी गडचिरोलीतील काँग्रेस मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बजावले. ...