मे महिन्यातील वाढत्या तापमानात काही विशिष्ट ठिकाणचे पाण्याचे स्त्रोत कायम राहत असतात. नेमकी हीच संधी हेरून शिकार करणारे लोक त्या ठिकाणी सापळे रचून या महिन्यात विविध प्रजातींच्या पक्षांची मोठ्या प्रमाणात शिकार करतात. पक्षांच्या शिकारीसाठी वैरागड भागात ...
घोट परिसरात बुधवारी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शीचे तहसिलदार अरुण येरचे यांच्यासोबत नुकसानग्रस्त गावात जाऊन पाहणी केली. ...
अहेरी तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. यामध्ये तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केली आहे. ...
१८ ते २८ मेदरम्यान नाशिक ते मुंबईपर्यंत एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या वतीने लाँग मार्च काढला जाणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ८६२ एनआरएचएम कर्मचारी व अधिकाऱ्यांपैकी जवळपास ५५० जण नाशिकसाठी रवाना झाले आहेत. ...
जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी २५ मे २0१८ रोजी तर कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा आणि भामरागड या चार नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ३० मे २०१८ रोजी संपणार आहे. ...
गडचिरोली नगर परिषदेने शहरातील २३ ओपन स्पेसच्या विकासासाठी निविदा काढल्या आहेत. मात्र यात मुलांसाठी विरंगुळ्याची साधने, वृद्ध नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची तरतूद नाही. यावरून खुल्या जागांच्या विकासाचे योग्य नियोजन नगर परिषदेने केले नसल्याचे दिसून ...
शहरातील जुनी वडसा व हेटी वॉर्डात मागील दोन दिवसांपासून अस्वलाचा वावर सुरू आहे. पाण्याच्या शोधात शहराकडे आलेल्या या अस्वलाला अनेकांनी पाहिल्याने दहशत पसरली आहे. ...
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कमलापूर व परिसरातील अनेक लाभार्थ्यांनी मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. परंतु यातील अनेक लाभार्थ्यांना अद्यापही दुसरा व तिसरा अनुदानाचा हप्ता मिळाला नाही. ...
धानोरा तालुक्यातील रांगी-धानोरा या १८ किमी रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडले असून या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी खड्ड्यांमुळे या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ...