शहरातील प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी वनविभागाची जागा मिळण्याचा निर्णय आता पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी अडला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सर्व त्रुटी दूर करून मुख्य वनसंरक्षकांमार्फत पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. ...
जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववीची प्रवेश परीक्षा १९ मे रोजी शनिवारला विविध केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत नियोजित केली होती. घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयातही या परीक्षेचे केंद्र होते. ...
राज्य शासनाने १ ते ३१ जुलै या कालावधील राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले. त्यात गडचिरोली जिल्ह्यात वन विभाग व इतर यंत्रणांना सुमारे ५० लाख ७३ हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे २०१७-१८ या वर्षात धानाची आधारभूत खरेदी करण्यात आली. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. परंतु येथे खरेदी केलेला तब्बल १२०८०.६८ क्विंटल धान उघड्यावर असल्याने धानाची नासाडी होण्याची शक्यता ...
आम्ही वर्षाचे ४० ते ५० हजार रुपये शासनाला टॅक्स भरून रितसर परवाना घेऊन प्रवासी वाहतूक करतो. पण तरीही आमच्यावरच पोलीस कारवाई करतात आणि विनापरवाना चालणाऱ्या पांढऱ्या प्रवासी वाहनांना सूट दिली जाते, हे असे का? ...
आरोग्य विभागाच्या पथकाकडून माणसांच्या शारीरिक स्वास्थ्याची तपासणी होतानाचे चित्र नेहमीच पहायला मिळते. मात्र शुक्रवारी जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाच्या पथकाकडून इमारतीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी सुरू होती. ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मे २०१७ पासून मानधन मिळाले नाही. सदर मानधन देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तालुका शाखा कोरचीच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. ...
यावर्षी जिल्हाभरातील १ हजार १७१ ग्रामसभांनी स्वत: तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापैकी केवळ ४३५ ग्रामसभांमधील तेंदूपत्त्याचे लिलाव झाले आहेत. सुमारे ७३६ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे. ...