चर्मकार समाजाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी मंगळवारी संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त चामोर्शी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या शोभायात्रेच्या निमित्ताने चर्मकार समाजाच्या एकतेचे दर्शन ...
त्रिशरण, पंचशील यांच्यासोबतच बुद्धाच्या अष्टांग मार्गाचा स्वीकार करून जीवन जगावे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे सचिव राजरत्न आंबेडकर यांनी केले. ...
तालुका मुख्यालयापासून १४ किमी अंतरावर असलेल्या दोटकुली येथील घनश्याम कवडू पोरटे यांच्या घरातील ३ लाख ४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. सदर घटना सोमवारी रात्री ८ ते ११ वाजताच्या सुमारास घडली. चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...
गडचिरोली येथे सुमारे तीन कोटी रुपये खर्चून आठ प्लॅटफार्म असलेले बसस्थानक बांधले जाणार आहे. या बसस्थानकाच्या कामाला गती आली आहे. गडचिरोली हे जिल्हा स्थळ आहे. ...
जिल्ह्यातील गौणखनिज व वनसंपत्तीमुळे हा जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा कितीतरी श्रीमंत आहे. पण या श्रीमंत जिल्ह्याचे नागरिक मात्र सर्वात गरीब आहेत. जिल्ह्यातील बांबू, मोहा, जेट्रोफा, धान, तणस यापासून विविध प्रक्रिया उद्योग, बायोडिझेल बनवून हा जिल्हा समृद् ...
कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेंद्रीय शेती उत्पादनाच्या विक्रीसाठी तयार करण्यात आलेला ‘गोफ्स’च्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी उत्पादनांची प्रशंसा केली. ...
ओराव या आदिवासी जमातीला अनुसूचित जमातीच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या मुख्य मागणीसाठी ओराव आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास पाच हजार नागरिक सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन ...
नक्षल्यांविरोधात मोठी भूमिका पार पाडणाऱ्या गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील सी-६० जवानांसाठी गडचिरोली येथे अत्याधुनिक व्यायामाच्या उपकरणांनी सुसज्ज ‘शक्तीगड’ व्यायामशाळा उभारण्यात आली. या व्यायामशाळेचे उद्घाटन सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
निजामाबाद-सिरोंचा-जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी राज तुमनूर बसथांब्याजवळ सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...